खुशखबर! आयफोन झाले स्वस्त; जाणून घ्या किंमती

On: September 10, 2024 11:11 AM
iPhone
---Advertisement---

iPhone l आयफोन प्रेमी कित्येक दिवसांपासून आयफोन 16 ची वाट पाहत होते. अशातच आता ॲपल कंपनीने आयफोन 16 सिरीज काल लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत ॲपल कंपनीने iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे एकूण चार फोन आणले आहेत. या चारही फोनमध्ये भन्नाट फिचर्स आहेत. येत्या 13 सप्टेंबरपासून या फोनच्या प्री-ऑर्डरला सुरवात देखील होणार आहे. तर येत्या 20 सप्टेंबरपासून या फोनच्या वितरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आयफोनची ही iPhone 16 सिरीज लाँच होताच ॲपल कंपनीने आपल्या याआधीच्या फोनच्या किमतीत मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

iPhone 15 सिरीजची किंमत काय आहे? :

आयफोन 16 सिरीज लाँच होताच ॲपल कंपनीने जुन्या फोनच्या किमतीत देखील घट केली आहे. कंपनीने या आयफोन्सच्या किमती तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्त केल्या आहेत. तसेच iPhone 16 ची सिरीज 79,900 रुपयांपासून पुढे लाँच केली आहे.

कंपनीने आता आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस या मॉडेल्सवर ॲपल कंपनीने तब्बल 10,000 रुपयांची कायमस्वरुपी सूट दिली आहे. त्यामुळे आता iPhone 15 हा स्मार्टफोन 69,900 रुपयांना मिळत आहे. या सोबतच बँक डिस्काउन्ट, एक्स्चेंज ऑफर आदी लाभ देखील मिळणार आहे. तर iPhone 15 Plus या स्मार्टफोनसाठी किंमत आता 79,900 रुपये आहे.

iPhone 14 सिरीजची किंमत काय आहे? :

कंपनीने आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस या मॉडेलची देखील किंमत कमी केली आहे. ॲपल कंपनीचे हे दोन्ही स्मार्टफोन 2022 साली लाँच करण्यात आले होते. त्यावेळी या दोन्ही मोबाईल्सची किंमत गेल्या वर्षी तब्बल 10,000 रुपयांनी कमी केली होती.

अशातच आता ॲपल कंपनीने पुन्हा एकदा या दोन्ही मॉडेल्सची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली आहे. याशिवाय या दोन्ही फोनच्या खरेदीवर आता 4,000 रुपयांचे बँक डिस्काउंट देखील दिले जात आहे. त्यामुळे आता iPhone 14 हा फोन 59,900 रुपयांना मिळत आहे. तर iPhone 14 Plus हा फोन 69,900 रुपयांना मिळत आहे.

News Title – iphone price cut

महत्त्वाच्या बातम्या-

शुभवार्ता! महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या किंमती?

बाप्पाच्या कृपेने आज मेषसह ‘या’ 5 राशींवर होणार धनवर्षाव!

मोठी बातमी! अभिनेत्री रश्मिका मंदानाचा अपघात, प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

व्यापरातील अडचणी तर विवाहातील अडथळे, ‘या’ राशीची सर्व संकटे होतील दुर

शरद पवार गटाचा बारामतीचा उमेदवार ठरला, युगेंद्र पवार यांनाच मिळणार तिकीट?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now