LIC चा भन्नाट धमाका! रोज ४५ रुपये गुंतवा आणि मिळवा २५ लाखांचा फंड; जाणून घ्या सविस्तर

On: April 2, 2026 1:11 PM
LIC Scheme
---Advertisement---

LIC New Jeevan Anand Plan | भारतामध्ये विमा आणि गुंतवणुकीसाठी Life Insurance Corporation of India (LIC) च्या योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. सुरक्षित भविष्यासाठी अनेक लोक LIC च्या विविध पॉलिसींमध्ये गुंतवणूक करतात. कमी गुंतवणुकीत दीर्घकालीन बचत आणि विमा संरक्षण देणाऱ्या योजनांपैकी न्यू जीवन आनंद ही योजना सध्या विशेष चर्चेत आहे.

भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा मिळावी आणि एक मोठा निधी तयार व्हावा, या उद्देशाने अनेक जण विमा पॉलिसी घेतात. LIC ची न्यू जीवन आनंद योजना ही बचत आणि विमा यांचा उत्तम संगम मानली जाते. दीर्घ कालावधीत कमी प्रीमियम भरून मोठा फंड तयार करण्याची संधी या योजनेत मिळते. (LIC Policy Benefits)

रोज थोडी बचत, मॅच्योरिटीला मोठा फंड :

LIC New Jeevan Anand Plan 915 ही योजना कमी प्रीमियममध्ये मोठा फायदा देणारी मानली जाते. उदाहरणार्थ, जर 35 वर्षांची व्यक्ती 5 लाख रुपयांच्या सम अश्योर्डसह 35 वर्षांसाठी पॉलिसी घेत असेल तर त्याला वर्षाला सुमारे 16,300 रुपये प्रीमियम भरावा लागतो.

याचा अर्थ दरमहा जवळपास 1,359 रुपये किंवा रोज साधारण 45 रुपये बचत करावी लागते. या पॉलिसीचा संपूर्ण कालावधी पूर्ण झाल्यावर एकूण गुंतवणूक सुमारे 5.70 लाख रुपये होते. मात्र बोनस आणि इतर लाभ मिळून मॅच्योरिटीच्या वेळी सुमारे 25 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.

LIC New Jeevan Anand Plan | मॅच्योरिटीनंतरही मिळतो लाइफ कव्हर :

या पॉलिसीची सर्वात मोठी खासियत म्हणजे मॅच्योरिटी झाल्यानंतरही विमा कव्हर सुरू राहतो. पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला मॅच्योरिटी रक्कम मिळते, पण त्यानंतरही 5 लाख रुपयांचे लाइफ कव्हर आयुष्यभर कायम राहते. त्यामुळे कुटुंबाला अतिरिक्त आर्थिक सुरक्षा मिळते.

याशिवाय या योजनेत गुंतवणुकीवर आयकर कायद्यानुसार कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते. तसेच मॅच्योरिटी आणि मृत्यू लाभ हे कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त असतात. दोन वर्षांनंतर पॉलिसीवर कर्ज घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच प्रीमियम भरण्यासाठी 15 ते 30 दिवसांचा ग्रेस पीरियड दिला जातो. (LIC New Jeevan Anand Plan)

18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती 15 ते 35 वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. गरजेनुसार अपघाती मृत्यू किंवा गंभीर आजारांसारखे अतिरिक्त रायडर्स जोडून विमा संरक्षण अधिक वाढवता येते. कमी गुंतवणुकीत मोठा फंड आणि आयुष्यभराची सुरक्षा हवी असल्यास LIC ची ही योजना अनेकांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरू शकते.

News Title: Invest Just ₹45 Daily in LIC Plan and Get Lifetime Insurance with Up to ₹25 Lakh Maturity Benefit

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now