२००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल करोडपती! जाणून घ्या यामागचं गणित

On: November 5, 2025 4:11 PM
Investment Rules
---Advertisement---

SIP Investment | प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य हवे असते. कोट्यवधींचा फंड तयार करावा, वृद्धापकाळी चिंता नसावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना वाटते, यासाठी मोठी कमाई आणि मोठी गुंतवणूक आवश्यक असते. प्रत्यक्षात मात्र हे अर्धसत्य आहे. जर तुम्ही दरमहा फक्त 2000 रुपयांची नियमीत बचत करून ती योग्य ठिकाणी गुंतवली, तर काही वर्षांतच तुम्हीही कोट्याधीश बनू शकता. या स्वप्नपूर्तीचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे ‘म्युच्युअल फंड SIP’.

नियमित गुंतवणुकीची ताकद :

SIP म्हणजे Systematic Investment Plan. यात ठराविक तारखेला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. म्युच्युअल फंड हे इतर पारंपारिक गुंतवणूक साधनांपेक्षा जास्त परतावा देऊ शकतात, त्यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्माणीसाठी हे उत्तम पर्याय ठरतात.

मात्र, सर्वच फंड्स फायदेशीर असतात असे नाही. काही फंड्सनी गुंतवणूकदारांना तोटाही दिला आहे. म्हणूनच, कोणत्या फंडमध्ये गुंतवणूक करायची हे ठरवताना अत्यंत सावधगिरी आवश्यक आहे.

SIP Investment | SIP निवडताना काय काळजी घ्यावी? :

SIP सुरू करण्यापूर्वी त्या फंडची मागील कामगिरी, परताव्याचा दर, तसेच भविष्यातील संभाव्यता तपासणे आवश्यक आहे. फक्त ट्रेंड पाहून गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. उदाहरणार्थ, दरमहा 500 रुपयांची SIP फारसा परतावा देणार नाही. त्याऐवजी 2000 रुपयांची मासिक SIP ठेवली, आणि ती दीर्घकाल टिकवली, तर मोठा फंड उभारता येतो. यासाठी आर्थिक शिस्त, सातत्य आणि संयम आवश्यक आहेत.

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा 2000 रुपयांची SIP सुरू केली आणि ती सलग 30 वर्षे एकही महिना न चुकवता चालू ठेवली, तर त्याला जवळपास 1.59 कोटी रुपयांचा फंड मिळू शकतो. यामध्ये सुमारे 39.47 लाख रुपये मूळ गुंतवणूक असतील आणि उर्वरित 1.20 कोटी रुपये हे परताव्यातून मिळतील. हा फायदा चक्रवाढ व्याजामुळे मिळतो — म्हणजे व्याजावर व्याज मिळत राहिल्याने रक्कम exponential पद्धतीने वाढते.

टॉप-अप SIP म्हणजे काय? :

टॉप-अप SIP म्हणजे दरवर्षी आपल्या SIP रकमेची 10% वाढ करणे. उदाहरणार्थ, पहिल्या वर्षी 2000 रुपये, तर दुसऱ्या वर्षी 2200 रुपये, तिसऱ्या वर्षी 2420 रुपये अशी गुंतवणूक वाढवली, तर परताव्यात जबरदस्त फरक पडतो. दीर्घकालीन दृष्टीकोनातून ही सवय तुम्हाला मोठा फंड तयार करण्यात मदत करू शकते.

म्हणजेच, फक्त 2000 रुपयांपासून सुरू झालेली बचत तुमच्या आर्थिक भविष्याची मजबूत पायाभरणी करू शकते. मात्र, गुंतवणुकीपूर्वी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि जोखीम प्रोफाइल लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.

News Title: Invest ₹2000 Monthly and Become a Crorepati with Mutual Fund SIP – Know the Top-Up Strategy and Returns

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now