Indias Richest Spiritual Gurus | भारतात हिंदू धर्माचा (Hindu Dharma) प्रचार आणि प्रसार करणारे अनेक संत आणि बाबा आहेत, जे त्यांच्या अनुयायांना मार्गदर्शन करतात. हे बाबा विविध कार्यक्रमांमधून आध्यात्मिक ज्ञान देतात आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील काही बाबांची संपत्ती देखील खूप मोठी आहे? (Indias Richest Spiritual Gurus)
कोट्यवधींची संपत्ती असलेले बाबा
अनेक बाबा त्यांच्या अनुयायांना योग्य मार्गदर्शन करताना दिसतात. भारतात असे काही बाबा आहेत, ज्यांची संपत्ती देखील फार तगडी आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा देखील थक्क करणारा आहे.
योगगुरु रामदेव बाबा
योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) आयुर्वेद, व्यवसाय, राजकारण आणि कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पतंजली (Patanjali) आयुर्वेद लिमिटेडची स्थापना केली. अहवालानुसार, त्यांची संपत्ती सुमारे १,६०० कोटी आहे.
श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar)
यांचे १५१ देशांमध्ये ३०० दशलक्ष अनुयायी आहेत. ते आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे (Art of Living Foundation) संस्थापक आहेत. त्यांच्याकडे आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रे, आरोग्य आणि फार्मसी केंद्रांसह अंदाजे १,००० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. (Indias Richest Spiritual Gurus)
सद्गुरू जग्गी वासुदेव (Sadhguru Jaggi Vasudev)
यांनी ईशा फाउंडेशनची (Isha Foundation) स्थापना केली आणि त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे १८ कोटी रुपये आहे.
आसाराम बापू (Asaram Bapu)
यांचे परदेशात ३५० आश्रम आणि १७ हजार बालसंस्कार केंद्रे आहेत. २०२१ पर्यंत आसाराम बापूंच्या (Asaram Bapu) ट्रस्टची वार्षिक उलाढाल ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.
प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj)
यांच्याकडे कोणतीही खाजगी मालमत्ता नाही, ते प्रवास करताना भक्तांच्या गाडीचा वापर करतात आणि जिथे राहतात त्याचे वीजबिल देखील भक्तच भरतात. (Indias Richest Spiritual Gurus)
Title : Indias Richest Spiritual Gurus and Their Astonishing Wealth








