मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ २ जलमार्गांवर ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरु होणार

On: July 16, 2025 11:13 AM
E-Water Taxi Launch
---Advertisement---

E-Water Taxi Launch | मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी, तसेच डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीटी या दोन जलमार्गांवर ही सेवा सुरुवातीला उपलब्ध होणार आहे.

संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आणि माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने (MDL) तयार केलेली ही सेवा, मुंबईतील वाहतुकीला पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय देणार आहे. या सेवेमुळे शहरातील तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि हरित उर्जा वापराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे.

२४ आसनी वातानुकूलित ई-वॉटर टॅक्सी :

सध्या MDL ने तयार केलेल्या ६ बोटींपैकी पहिली बोट ही २४ आसनी वातानुकूलित ई-वॉटर टॅक्सी इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही टॅक्सी सध्या अंतिम तांत्रिक चाचण्यांमधून जात आहे आणि ती १ ऑगस्टपासून समुद्रात धावण्यास सज्ज होणार आहे.

या टॅक्सींचा संचालन आणि देखभाल खर्च तुलनेने कमी असल्यामुळे प्रवाशांना तिकीट दर अधिक परवडणारे असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. जेएनपीटी आणि क्रूझ टर्मिनस येथे चार्जिंग स्टेशनची उभारणी अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात ते कार्यान्वित होईल. (E-Water Taxi Launch)

E-Water Taxi Launch | टप्प्याटप्प्याने विस्तार आणि इकोसिस्टम निर्माण :

सुरुवातीला फक्त दोन मार्गांवर सेवा दिली जाणार असली तरी, बेलापूर, खारापुरी आणि मांडवा या किनारपट्टीवरील शहरांपर्यंत टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचे नियोजन आहे. यामुळे मुंबई-ठाणे परिसरातील लाखो नागरिकांना जलमार्गाने प्रवासाचा एक नवीन व सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.

ही सेवा याआधी सुरू झालेल्या पारंपरिक (डिझेल-आधारित) वॉटर टॅक्सींच्या तुलनेत अधिक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे, भारत सरकारच्या हरित वाहतूक धोरणाच्या दिशेनेही ही सेवा एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे.

News Title: India’s First E-Water Taxi to Launch in Mumbai from August 1, Connecting Gateway of India to JNPT

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now