Corruption | ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या (Transparency International) अहवालानुसार, भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे. राजकीय नेते भ्रष्टाचाराच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे आणि पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे भारत १८० देशांच्या यादीत ९६ व्या स्थानावर घसरला आहे. भारतासाठी ही अत्यंत चिंतेची बाब झाली आहे कारण भारतीयांना टप्प्या टप्प्यावर भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत आहे. (Corruption)
भारताची स्थिती आणि शेजारी देश-
भारताचा भ्रष्टाचारातील स्कोअर ३८ आहे, जो २०२३ मध्ये ३९ आणि २०२२ मध्ये ४० होता. एका अंकाने स्कोअर कमी झाल्यामुळे भारताची तीन स्थानांनी घसरण झाली आहे. डेन्मार्क (Denmark), फिनलंड (Finland) आणि सिंगापूरमध्ये (Singapore) सर्वात कमी भ्रष्टाचार आहे. दक्षिण सुदान, सोमालिया, व्हेनेझुएला, सिरिया आणि येमेन या देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे.
पाकिस्तानमध्येही (Pakistan) भ्रष्टाचार वाढला असून, तो १३३ व्या स्थानावरून १३५ व्या स्थानावर गेला आहे. श्रीलंका (Sri Lanka) १२१ व्या, तर बांगलादेश (Bangladesh) १४९ व्या क्रमांकावर आहे. (Corruption)
भ्रष्टाचाराचे परिणाम आणि कारणे-
भ्रष्टाचारामुळे पर्यावरणीय धोरणांवर नकारात्मक परिणाम होतो. उद्योग आणि राजकीय नेत्यांमधील लागेबांध्यांमुळे प्रभावी धोरणे आणली जात नाहीत, तसेच हवामान निधीचा गैरवापर आणि विविध प्रकल्पांमध्ये अपारदर्शकता येते, असे अहवालात म्हटले आहे.
लोकशाही मजबूत असलेल्या देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी असते. पूर्णपणे लोकशाही असलेल्या २४ देशांचा स्कोअर ७३ आहे, तर अर्धवट लोकशाही असलेल्या ५० देशांचा स्कोअर ४७ आणि स्वैरशासित सत्ता असलेल्या २५ देशांचा स्कोअर ३३ आहे.
कोणत्या काळात भ्रष्टाचार?-
यूपीए (UPA) सरकार आणि एनडीए (NDA) सरकार, नेमके कोणाच्या काळात जास्त भ्रष्टाचार झाला, यावर आकडेवारी वेगवेगळी माहिती दर्शवते, असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. (Corruption)
Title : India’s Corruption Rank Worsens Pakistan at 135th






