वायूसेनेचं विमान कोसळलं; एकाचा मृत्यू, बचाव कार्य सुरू

On: July 9, 2025 3:32 PM
Air force plane crash
---Advertisement---

Plane Crash | राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रतनगड परिसरात भारतीय वायूसेनेचं एक विमान आज भीषण अपघातात कोसळलं. भानूदा गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघातस्थळी एक मृतदेह सापडला आहे. तो विमानाच्या पायलटचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Air force plane crash)

जळालेलं विमान आणि २०० फूट परिसरात विखुरलेला मलबा :

विमान खाली कोसळल्याचं दृश्य स्थानिक ग्रामस्थांनी पाहिलं, आणि त्यांनी तातडीने पोलिस व प्रशासन यांना माहिती दिली. घटनेनंतर काही वेळातच पोलिस आणि वायूसेनेचे पथक घटनास्थळी दाखल झाले, आणि बचाव व शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

या अपघातात विमानाचा मलबा तब्बल २०० फूट परिसरात पसरलेला आढळून आला आहे. विमानाचे तुकडे दूरवर उडून गेले आहेत. अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की विमानात एकच पायलट होता की इतर कोणताही सदस्य होता. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. (Air force plane crash)

Plane Crash | पूर्वीही घडलेल्या अशाच दुर्घटना :

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत भारतीय वायूसेनेच्या विमान दुर्घटनांचे प्रकार समोर आले आहेत. यापूर्वी गुजरातच्या जामनगर येथे जाग्वार विमान कोसळलं, यात एक पायलट ठार झाला होता. तसेच हरियाणाच्या अंबाला एअरबेसवरून उड्डाण घेतलेलं विमान पंचकुला परिसरात कोसळलं होतं.

याशिवाय भानूदा गावाजवळील या घटनेच्या पार्श्वभूमीवर वायूसेनेनं तत्काळ तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे. या अपघाताचं नेमकं कारण काय, याबाबत अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

News Title: Indian Air Force Jet Crashes in Rajasthan’s Churu; One Body Found, Rescue Operation Ongoing

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now