भारतीय संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयर्लंड टी-20 सीरीजमधून बाहेर, काय घडलं?

On: June 23, 2026 11:09 AM
India vs Ireland T20
---Advertisement---

India vs Ireland | आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेची सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. आधीच मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे बाहेर गेलेला असताना, आता संघाचा आणखी एक स्टार अष्टपैलू खेळाडूला दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.२६ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेच्या अवघ्या तीन दिवस आधी हा धक्का बसल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण आहे.

दुखापतीचे स्वरूप आणि बीसीसीआयचा निर्णय

नितीश कुमार रेड्डी हा आपल्या स्फोटक फलंदाजी आणि उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीमुळे भारतीय संघाचा एक महत्त्वाचा कणा मानला जात होता. मात्र, या दुखापतीमुळे त्याच्या खेळण्यावर तूर्तास पूर्णविराम लागला आहे.

नितीशच्या डाव्या मांडीच्या स्नायूमध्ये (Hamstring) सूज आली असून तिथे फायबर फाटल्याचे (Fiber Tear) वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन बीसीसीआयने (BCCI) त्याला तात्काळ उपचारासाठी बंगळूरु येथे जाण्याचे निर्देश दिले आहेत.

इंग्लंड दौऱ्यातूनही बाहेर पडण्याचा धोका

नितीश रेड्डीच्या या दुखापतीचा फटका केवळ आयर्लंड मालिकेपुरता मर्यादित नसून, आगामी इंग्लंड दौऱ्यावरही याचे सावट आहे. १ जुलै २०२६ पासून भारताची इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे.

वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी नितीशला किमान ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत तो पूर्ण तंदुरुस्त झाल्यास किमान एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी तरी संघात पुनरागमन करेल, अशी आशा निवड समिती आणि चाहत्यांना आहे.

भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिकेचे वेळापत्रक

२६ जून, २०२६ भारत विरुद्ध आयर्लंड पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय बेलफास्ट

२८ जून, २०२६ भारत विरुद्ध आयर्लंड दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय बेलफास्ट

News Title: India vs Ireland T20 Series Nitish Kumar Reddy Injury

Join WhatsApp Group

Join Now