भारत विरुद्ध अफगाणिस्तान मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रोहित आणि विराट खेळणार का?

On: May 19, 2026 7:07 PM
Test Squad INDIA
---Advertisement---

India vs Afghanistan | भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गुवाहाटी (Guwahati) येथे पार पडलेल्या बीसीसीआयच्या (BCCI) महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला बोर्ड सचिव देवजित सैकिया, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, आरपी सिंग आणि प्रज्ञान ओझा उपस्थित होते. आगामी २०२७ च्या विश्वचषकाची (World Cup 2027) तयारी लक्षात घेऊन निवड समितीने संघात मोठे बदल केले आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठी अपडेट

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या दोन्ही दिग्गज आणि स्टार खेळाडूंचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, बीसीसीआयने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांची निवड झाली असली, तरी ते प्रत्यक्ष मालिकेत खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय त्यांच्या मॅच-फिटनेसचा (तंदुरुस्ती) आढावा घेऊनच केला जाईल.

ऋषभ पंतचे उपकर्णधारपद गेले; वनडे संघातूनही सुट्टी

या संघ निवडीतील सर्वात मोठा आणि धक्कादायक निर्णय म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्याबाबत घेण्यात आला आहे. कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून पंतला हटवून ही जबाबदारी आता केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये लखनऊ सुपरजायंट्सचे (LSG) नेतृत्व करताना पंतला अपयश आले होते, त्याचाच फटका त्याला बसल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, त्याला थेट एकदिवसीय संघातूनच वगळण्यात आल्यामुळे क्रीडा वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

घोषित झालेला भारतीय संघ खालीलप्रमाणे:
१. एकदिवसीय कसोटी संघ (Test Squad):
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, हरिगुरु सुर्वे, मानवेश सुर्वे, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

२. एकदिवसीय मालिका संघ (ODI Squad):
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्षित राणा.

News Title: India vs Afghanistan Series Team India Squad Announced

Join WhatsApp Group

Join Now