उद्या रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या सर्व माहिती

On: December 14, 2024 3:05 PM
IND vs PAK
---Advertisement---

IND vs PAK l क्रिकेटप्रेमींचं लक्ष हे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे लागलं आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन हायब्रिड मॉडेलनुसार होणार आहे. तसेच सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी हे भारत विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता या सामन्याची माहिती समोर आली आहे.

उद्यापासून होणार सुरवात? :

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात उद्या म्हणजेच रविवारी 15 डिसेंबरला महामुकाबला होणार आहे. यावेळी अंडर 19 वूमन्स आशिया कप स्पर्धेचं यावर्षी प्रथमच आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होत आहे. तसेच यावेळी या स्पर्धेदरम्यान भारतीय संघासह एकूण 6 संघ खेळणार आहेत.

यामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान,श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि यजमान मलेशिया हे संघ एकमेकांना भिडणार आहेत. तर यावेळी या 6 संघांची 3-3 नुसार 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ए ग्रुपमध्ये बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ आहेत.

IND vs PAK l कधी रंगणार सामना? :

भारत विरुद्ध पाकिस्तान या हायहोल्टेज सामन्याला 15 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर या स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तर मोबाईलवर सोनी लिव्ह वर या संपूर्ण सामन्याचा थरार अनुभवता येईल.

News Title – Ind vs pak u 19 womens asia cup india vs Pakistan live

महत्त्वाच्या बातम्या-

सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

अटकेनंतर अल्लू अर्जुनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

एकनाथ शिंदेंच्या दोन बड्या नेत्यांना झटका! मंत्रिपदातून पत्ता कट होणार?

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, पाहा संपूर्ण यादी

कागदाच्या कपात चहा पिताय? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकतो ‘हा’ आजार

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now