घर भाडेकरूंसाठी १ एप्रिलपासून नवीन नियम लागू! जाणून घ्या सविस्तर

On: March 30, 2026 1:57 PM
HRA New Rules 2026
---Advertisement---

HRA New Rules 2026 | नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून करदात्यांसाठी काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. नवीन आयकर अधिनियम 2025 अंतर्गत घरभाडे भत्ता (HRA) क्लेम करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. या नव्या नियमांनुसार भाडे सवलत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरमालकाशी असलेले नाते स्पष्टपणे जाहीर करणे बंधनकारक असणार आहे. (HRA Claim Rules)

1 एप्रिल 2026 पासून हे नवीन नियम लागू होण्याची शक्यता असून सरकारने यासंदर्भात नवीन ड्राफ्ट नियम आणि फॉर्म जाहीर केले आहेत. त्यामुळे HRA क्लेम करताना आधीपेक्षा अधिक माहिती देणे आवश्यक होणार आहे.

HRA क्लेम करताना द्यावी लागणार अतिरिक्त माहिती :

नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांना HRA क्लेम करताना घरमालकाबाबत सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये घरमालकाचे नाव, पत्ता, पॅन नंबर आणि त्याच्याशी असलेले नाते याची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. यासाठी नवीन फॉर्म 124 लागू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (HRA New Rules 2026)

सध्याच्या नियमांमध्ये घरमालकाशी असलेल्या नात्याबाबत माहिती देण्याची सक्ती नव्हती. मात्र, नव्या नियमांमुळे करप्रणाली अधिक पारदर्शक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

HRA New Rules 2026 | खोट्या भाडेपावत्यांवर बसणार आळा :

अनेक वेळा काही करदाते कर वाचवण्यासाठी खोट्या भाडेपावत्या सादर करतात किंवा नातेवाईकांच्या नावावर भाडे दाखवून HRA सवलत घेतात. नव्या नियमांमुळे अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Income Tax Rule Change India)

मात्र, कुटुंबातील सदस्यांना भाडे देण्यास कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. परंतु अशा व्यवहारांसाठी वैध भाडेकरार असणे आवश्यक आहे. तसेच भाडे रोख स्वरूपात न देता बँकेद्वारे देणे आवश्यक असेल. घरमालकानेही आपल्या आयकर विवरणपत्रात हे भाडे उत्पन्न म्हणून दाखवणे बंधनकारक असेल.

News Title : Income Tax Rule Change: New HRA Claim Rules from April 1; Tenants Must Declare Relationship with Landlord

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now