Imtiaj Jaleel | भाजप नेत्या आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवैसींनी केलेल्या भाषणाचा दाखला देत त्यांच्यावर टीका केली होती. 15 मिनिटं नाहीतर केवळ 15 सेकंद जरी पोलीस हटवले तरीही त्यांना पळावं कुठे हे कळणार नाही, अशा कडक शब्दात त्यांनी हल्लाबोल केला. यालाच आता इम्तियाज जलील यांनी (Imtiaj Jaleel) प्रत्युत्तर दिलं आहे.
नवनीत राणा यांची टीका
नवनीत राणा या भाजप उमेदवार लता माधवी यांच्या प्रचारसभेत हैदराबाद येथे बोलत होत्या. त्यावेळी राणा यांनी इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला केली. 15 मिनिट नाहीतर केवळ 15 सेकंद जरी पोलीस हटवले तरीही त्यांना पळावं कुठे हे कळणार नाही, असा हल्लाबोल केला. यावर आता जलील यांनी नवनीत राणा यांना चांगलं प्रत्युत्तर दिलं आहे.
संदिपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तिाज जलील आमने-सामने लढणार आहेत. आज प्रचारासाठी शेवटचा दिवस आहे. याचपार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी पीर बाजारातून मोठी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं आहे. खासदार म्हणून आम्ही पुन्हा एकदा निवडून येणार असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. यावेळी बोलत असताना त्यांनी नवनीत राणा यांच्यावर पलटवार केला.
इम्तियाज जलील यांचा पलटवार
भारतीय जनता पार्टीला काही भुंकणारी लोकं हवे होते. मात्र नवनीत राणा भुंकण्यासाठी भाजपने ठेवलं असल्याचं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. तसेच नवनीत राणा यांना चिप मेंटॅलिटीची बाई असल्याचं जलील यांनी म्हटलं. तुमचा धर्म कोणता आहे त्याचा आम्ही आदर करतो. हनुमान चालीसा ही उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर का वाचायाची असं म्हणत इम्तियाज जलील यांनी नवनीत राणा यांना सुनावलं.
दरम्यान, नवीन आलेल्या बाईला काहीही कळत नाही. कॅमेरा दिसला की आपली शूटिंग सुरू असल्याचं पाहायला मिळते, ओवैसी पण चार टर्म खासदार आहेत. त्यांना अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. तुम्ही त्या बाईला जर म्हटलात मी कव्हरेज देतो तर डान्स करायला तयार होईल, असा पलटवार इम्तियाज जलील यांनी केला.
संभाजीनगरमध्ये थेट तिरंगी लढत होणार आहे. संदिपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तिायाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तिन्ही उमेदवार ताकदीचे असून संभाजीनगर हा इम्तियाज जलील यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. गेले काही टर्म एमआयएमचा खासदार दिसत होता. इम्तियाज जलील देखील एमआयएममधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
News Title – Imtiaj Jaleel Replied To Navneet Rana At Sambhaji Nagar News Update
महत्त्वाच्या बातम्या
अजित पवारांच्या सभांनंतर नूर पालटला, राष्ट्रवादीची सगळी ताकद श्रीरंग बारणेंच्या पाठिशी!
“राज ठाकरेंना आताच एवढा पुळका का?, भाजपची राज ठाकरेंनाही धमकी?”
पुढील चार दिवस धोक्याचे; पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट
प्रज्वल रेवन्नानंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, राजकारणात खळबळ
कंड जिरवेन म्हणणाऱ्या अजित पवारांना निलेश लंकेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…






