उन्हाळ्यात टायरकडे दुर्लक्ष धोकादायक; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

On: February 22, 2025 10:07 AM
Ignoring Tyres in Summer Can Be Dangerous 
---Advertisement---

Tyre | वाढत्या उन्हामुळे रस्त्यांचा पृष्ठभाग तापतो. अशावेळी वाहनांच्या टायरची स्थिती, टायरमधील हवेचा दाब (tyre pressure) योग्य ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास टायर खराब होण्याची शक्यता वाढते, तसेच ते फुटून अपघात होण्याचीही भीती असते.

टायर कधी बदलावा?

टायर कंपन्यांच्या (tyre companies) मते, तीन वर्षांनी टायर बदलावा.
व्यावसायिक वाहनचालक (commercial drivers) चार वर्षांनी टायर बदलण्याचा सल्ला देतात.
टायर कट झाल्यास किंवा फुगवटा आल्यास, त्वरित बदलावे.
सर्वसाधारणपणे, 30 ते 50 हजार किमी प्रवासानंतर टायर बदलावा.

टायरची गुणवत्ता (quality), चालवण्याची पद्धत आणि रस्त्यांची स्थिती यावरही टायर किती काळ टिकेल, हे अवलंबून असते. उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने टायरमधील हवा तापते, ज्यामुळे टायर फुटण्याची शक्यता वाढते. तसेच, चार वर्षे जुने झालेले टायर, कडेला तडे गेलेले टायर देखील फुटू शकतात.

टायरमध्ये नायट्रोजन (Nitrogen) अधिक सुरक्षित

बरेच लोक कारच्या टायरमध्ये नॉर्मल हवा (normal air) भरतात, जी टायरसाठी चांगली नसते. नायट्रोजन गॅस (nitrogen gas) भरणे अधिक सुरक्षित मानले जाते, कारण त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. वाहनाचा पाच हजार किमी प्रवास झाल्यावर अलाइनमेंट (alignment) चेक करावी.

काय काळजी घ्याल?

कोणत्याही गाडीची सुरक्षितता टायरच्या स्थितीवर अवलंबून असते. प्रवासाला निघताना टायरमधील हवा योग्य प्रमाणात आहे का, याची खात्री करा. वाहनांची वेळोवेळी सर्व्हिसिंग (servicing) करा. तपासणीत काही दोष आढळल्यास, त्वरित दुरुस्ती करून घ्यावी.

Title : Ignoring Tyres in Summer Can Be Dangerous 

 

Join WhatsApp Group

Join Now