IDBI Bank Recruitment | तुम्ही पदवीधर आहात आणि बँक भरतीची (Bank Recruitment) तयारी करत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी करण्यात आली असून, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख आणि पगाराचा तपशील देण्यात आला आहे. (IDBI Bank Recruitment)
रिक्त पदांचा तपशील
आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (Junior Assistant Manager – JAM) पदाच्या ६५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी २६० पदे खुल्या प्रवर्गासाठी, १०० पदे अनुसूचित जाती (Scheduled Caste) प्रवर्गासाठी, ५४ पदे अनुसूचित जमाती (Scheduled Tribe) प्रवर्गासाठी, ६५ पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी आणि १७१ पदे इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी राखीव आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. उमेदवारांच्या वयाची गणना १ मार्च २०२५ रोजी केली जाईल.
अर्ज शुल्क
आयडीबीआय बँक (IDBI Bank) ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (Junior Assistant Manager) भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १ हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागेल.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम ऑनलाइन चाचणी (Online Test) द्यावी लागेल. ऑनलाइन परीक्षेत निर्धारित कटऑफ (Cutoff) गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. दोन्ही टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आणि त्यांना नियुक्ती दिली जाईल. (IDBI Bank Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार आहे आणि १२ मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पदवीधर उमेदवार आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) अधिकृत वेबसाइट http://www.idbibank.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्जात त्रुटी असल्यास किंवा अर्ज मुदतीनंतर आल्यास तो स्वीकारला जाणार नाही.
Title : IDBI Bank Recruitment 650 Junior Assistant Manager Vacancies






