तुम्हीही चहा-कॉफीचे शौकीन आहात, सावधान! शास्त्रज्ञांनी दिला भयंकर इशारा

On: May 15, 2024 8:38 AM
Tea Lover
---Advertisement---

Avoid Tea Coffee l चहा प्रेमी भारतात सर्वत्र आढळतात. इथल्या लोकांना फक्त हिवाळ्यातच नाही तर प्रचंड उष्णतेमध्येही चहा प्यायला आवडतो. पण आता टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. चहा पीत असाल तर जरा जपून राहा. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) भारतीयांसाठी आहाराशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये निरोगी जीवनासोबतच विविध आरोग्यदायी आहारावर भर देण्यात आला आहे.

ICMR ने लोकांना जेवणापूर्वी आणि जेवणानंतर चहा पिण्यास केली मनाई :

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या संशोधन शाखा वैद्यकीय पॅनेलने म्हटले आहे की, चहा आणि कॉफीचा वापर मर्यादित असावा. तसेच ICMR ने लोकांना जेवणापूर्वी आणि जेवणानंतर चहा पिण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. जरी संशोधकांनी त्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली नसली तरी त्यांनी कॅफिनच्या प्रमाणाबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, एक कप कॉफीमध्ये 80-120 मिलीग्राम कॅफिन असते आणि इन्स्टंट कॉफीमध्ये 50-65 मिलीग्राम कॅफिन असते. चहाबद्दल बोलायचे झाले तर त्यात 30-65 मिलीग्राम कॅफिन असते. शास्त्रज्ञांनी चहा आणि कॉफीचे सेवन करण्यास मनाई केली आहे जेणेकरून एका दिवसात 300 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन शरीरात प्रवेश करू नये.

Avoid Tea Coffee l चहा, कॉफीमुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते :

एक व्यक्ती एका दिवसात 300 मिलीग्राम कॅफिन सहन करू शकते. यावर ते शरीरासाठी हानिकारक असू शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, व्यक्तीने जेवणाच्या किमान एक तास आधी आणि नंतर कॉफी आणि चहा पिणे टाळावे. कारण कॉफी आणि चहामध्ये टॅनिन नावाचे संयुग असते, त्याचे सेवन शरीरात लोह शोषण्यास अडथळा आणते.

लोहाच्या कमतरतेमुळे, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात ॲनिमियासारखी परिस्थिती विकसित होते. त्यामुळे शरीर थकवा, दम लागणे, वारंवार डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे, त्वचा फिकट पडणे, वारंवार बर्फ खावासा वाटतो. त्यामुळे केसही खूप गळतात त्यामुळे चहा आणि कॉफीचे सेवन शक्यतो टाळावे.

News Title – ICMR Alert Avoid Tea Coffee 

महत्त्वाच्या बातम्या

प्रफुल पटेलांच्या ‘त्या’ कृत्यांवरून शिवप्रेमींमध्ये उसळती संतापाची लाट

या दोन राशींचे नशीब हिऱ्यापेक्षाही चमकणार

कार्तिकी गायकवाडच्या घरी आला नवा गोंडस पाहुणा; कार्तिकी रोनित झाले आई-बाबा

‘या’ 2 लोकांसोबत मैत्री म्हणजे पैशांची बरबादी!

‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now