अजितदादांसोबत ‘हा’ नेता विमानानं जाणार होता; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

On: February 5, 2026 4:31 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash | अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आता आठवडा पूर्ण झाला असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना 28 जानेवारी रोजी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात असतानाच आता एका बड्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar Statement) यांनी सांगितले की, तेही अजित पवारांसोबत त्याच विमानानं बारामतीला जाणार होते. मात्र, ऐनवेळी मुंबईत उशिरा पोहोचल्यामुळे ते विमानात चढू शकले नाहीत आणि त्यामुळेच आपला जीव वाचल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा दावा समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

‘नियतीमुळे वाचलो’, महादेव जानकरांचा खुलासा :

महादेव जानकर (Mahadeo Jankar) यांनी सांगितले की, अपघाताच्या काही दिवस आधी अजित पवार यांच्याशी त्यांचा संवाद झाला होता. त्यावेळी त्यांनी एकत्र बारामतीला जाण्याचे ठरवले होते. 28 जानेवारीच्या सकाळी दोघेही एकाच विमानाने जाणार होते. मात्र, मुंबईत उशीर झाल्यामुळे जानकर विमानात पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले.

या घटनेबाबत बोलताना जानकर यांनी अजित पवार यांच्या निधनाला अत्यंत दुर्दैवी म्हटले असून, त्यांच्या जाण्यामुळे राज्याची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली आहे. या विधानानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

Ajit Pawar Plane Crash | धुकं आणि तांत्रिक बिघाडामुळे अपघात? :

प्राथमिक तपासात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होणे आणि विमानातील तांत्रिक बिघाड यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीच्या धावपट्टीपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर हे विमान कोसळले होते. या दुर्घटनेत अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला. (Ajit Pawar Plane Crash)

29 जानेवारी रोजी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आता महादेव जानकर यांच्या दाव्यामुळे या दुर्घटनेशी संबंधित चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

News Title : I Was Also Supposed to Travel with Ajit Pawar on the Same Plane, But… Shocking Claim by Senior Leader

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now