HSRP नंबर प्लेटसाठी उरलेत काहीच दिवस; मुदत संपण्यापूर्वी ‘हे’ काम करा!

On: June 29, 2026 8:08 PM
HSRP Number Plate
---Advertisement---

HSRP Number Plate | राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 रोजी संपत आहे. मुदतीनंतर म्हणजेच 1 जुलै 2026 पासून HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांवर परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीसांकडून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई सुरू होणार आहे. त्यामुळे अद्याप नंबर प्लेट बसवली नसेल तर तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अपॉइंटमेंट घेतलेल्यांना दिलासा :

HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांना केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर RTO मधील अनेक महत्त्वाच्या सेवांपासूनही वंचित राहावे लागणार आहे. वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जाची नोंद चढवणे किंवा कमी करणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारखी कामे HSRP शिवाय होणार नाहीत. मात्र वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ज्या वाहनधारकांनी 30 जूनपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर HSRP बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा मिळणार आहे. राज्यभर HSRP बसवण्यासाठी तीन झोन निश्चित करण्यात आले असून त्यासाठी अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी केवळ अधिकृत माध्यमातूनच नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

HSRP Number Plate | HSRP नंबर प्लेटचे अधिकृत दर :

राज्य शासनाने HSRP नंबर प्लेटसाठी अधिकृत शुल्क निश्चित केले आहे. त्यानुसार दुचाकी वाहनांसाठी 450 रुपये, तीनचाकींसाठी 500 रुपये, तर हलकी मोटार वाहने तसेच मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये (GST वगळून, फिटमेंट शुल्कासह) आकारले जाणार आहेत.

केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अंतर्गत परिवहन विभाग आणि पोलीस संयुक्त किंवा स्वतंत्रपणे कारवाई करणार आहेत. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनाही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

News Title : HSRP Number Plate Deadline Ends Today; Action Against Vehicles Starts From July 1 in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now