काऊंटडाऊन सुरू! बारावीचा निकाल आज; ‘या’ लिंकवर बघा तुमचा निकाल

On: May 5, 2025 7:48 AM
HSC result 2025 Out Today at 1 PM
---Advertisement---

HSC result 2025 | Maharashtra Board HSC Result 2025 आज म्हणजेच 5 मे रोजी जाहीर होणार आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन माध्यमातून जाहीर होईल. या निकालासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठ्या आतुरतेने वाट पाहिली होती. (HSC result 2025 )

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागीय बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे

विद्यार्थी आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतील:

निकाल कसा पाहाल?

वरीलपैकी कोणत्याही संकेतस्थळावर जा

‘HSC Result 2025’ लिंकवर क्लिक करा

तुमचा सीट नंबर आणि आईचं नाव भरून सबमिट करा

तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल

निकालाचा प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करा

डिजिटल गुणपत्रिका

यावर्षी Digilocker App च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांची डिजिटल गुणपत्रिका प्राप्त करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी app डाऊनलोड करून आवश्यक माहिती भरल्यानंतर डिजिटल सर्टिफिकेट त्यांना मिळेल.

 Title: HSC result 2025 Out Today at 1 PM

 

 

Join WhatsApp Group

Join Now