PM Kisan Yojana l केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM-KISAN) आतापर्यंत १९ हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले गेले आहेत. आता २० व्या हप्त्याचे ₹2000 लवकरच दिले जाणार असून, अद्याप योजनेत नोंदणी न केलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.
नोंदणीसाठी पात्रता काय? :
PM-KISAN योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
– अर्जदाराकडे शेती करण्यासाठी जमीन असावी.
– नाव राज्य व केंद्र सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदलेले असावे.
– आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर आवश्यक.
– जमीन संबंधित कागदपत्रे (७/१२ उतारा, मालकी कागदपत्रे).
PM Kisan Yojana l ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
– सर्वात प्रथम https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
– त्यानंतर “New Farmer Registration” या पर्यायावर क्लिक करा.
– पुढे, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि 10 अंकी मोबाईल नंबर नोंदवा.
– त्यानंतर तुमचं राज्य निवडा व कॅप्चा कोड भरून OTP सबमिट करा.
– आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन कागदपत्रे अपलोड करा.
– सर्व माहिती भरून ‘Submit’ करा. तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर होईल.
ऑफलाईन नोंदणीसाठी काय कराल? :
जर ऑनलाइन नोंदणी शक्य नसेल, तर जवळच्या CSC केंद्रावर भेट द्या. तसेच आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२) घेऊन जा. यानंतर CSC ऑपरेटर तुमचा अर्ज भरून घेईल व पडताळणी करून सबमिट करेल.








