Ration Card Reactivation | अनेक नागरिकांचे रेशन कार्ड विविध कारणांमुळे निष्क्रिय (सस्पेंड) झालेले असते. त्यामुळे रेशन दुकानातून धान्य किंवा इतर सुविधा मिळण्यात अडचणी येतात. विशेषतः केवायसी न करणे किंवा दीर्घकाळ धान्य न घेणे ही त्यामागील मुख्य कारणे असतात. मात्र आता नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. कारण मोबाईलवरून काही सोप्या स्टेप्स पूर्ण करून बंद झालेले रेशन कार्ड पुन्हा सुरू करता येऊ शकते.
केंद्र सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी UMANG (Unified Mobile Application for New-age Governance) हे ॲप उपलब्ध करून दिले आहे. या ॲपच्या माध्यमातून रेशन कार्डशी संबंधित अनेक सेवा घरबसल्या मिळू शकतात. यामध्ये रेशन कार्डची माहिती तपासणे, सदस्यांची माहिती अपडेट करणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
UMANG ॲप कसे उपयोगी ठरते? :
या ॲपमध्ये Mera Ration आणि Public Distribution System (PDS) या सेवा उपलब्ध आहेत. या सेवांच्या मदतीने नागरिकांना रेशन कार्डची स्थिती तपासणे, माहिती अद्ययावत करणे तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होते. (Ration Card Reactivation)
सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून UMANG ॲप डाउनलोड करून मोबाईल नंबरच्या आधारे नोंदणी करावी लागते. त्यानंतर MPIN सेट करून लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर सर्च बारमध्ये ‘Mera Ration’ किंवा ‘PDS’ असे सर्च करावे. त्यानंतर संबंधित राज्य निवडून ‘View Ration Card Details’ या पर्यायावर क्लिक करून रेशन कार्ड क्रमांक टाकावा.
Ration Card Reactivation | बंद रेशन कार्ड पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया :
जर तुमचे रेशन कार्ड निष्क्रिय झाले असेल, तर त्यासाठी ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या ‘E-KYC’ किंवा ‘Update Member Details’ या पर्यायाचा वापर करावा लागतो. या प्रक्रियेत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक असते. संबंधित सदस्याचे नाव निवडून आधार क्रमांक टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर OTP येतो.
हा OTP टाकल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होते आणि रेशन कार्ड पुन्हा सक्रिय होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे नागरिकांना रेशन दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्य आणि इंधनाचा लाभ पुन्हा घेता येतो. (Mera Ration App)
सरकारच्या मते ई-केवायसी प्रक्रियेमुळे रेशन वितरण प्रणाली अधिक पारदर्शक बनते. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना रोखणे शक्य होते आणि पात्र नागरिकांपर्यंत अन्नधान्य योग्य पद्धतीने पोहोचते.





