Horoscope Today | दैनिक राशिफळ हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशींचे (Horoscope Today) तपशीलवार वर्णन केले जाते.
ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
त्यानुसार, आज 19 ऑगस्टचा दिवस काही राशीसाठी अत्यंत शुभ असणार आहे. आज रक्षा बंधनाचा दिवस जवळपास सर्वच 12 राशीसाठी चांगला असणार आहे. आज काही व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.त्यातच आज श्रावण सोमवार असल्याने महादेवाची देखील कृपा राहील.
आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा (Horoscope Today)आहे. पौर्णिमा तिथी पहाटे 3 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 11 वाजून 56 मिनिटांपर्यंत राहील. आज नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सण साजरे केले जाणार आहेत. नारळी पौर्णिमेचा हा सण कोळी बांधवासाठी तर रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी खास मानला जातो. आजचा हा अत्यंत शुभ दिवस कोणत्या राशीसाठी कसा असणार, याबाबत खाली सविस्तर माहिती दिली आहे.
आजचे राशीभविष्य
मेष : आज कामाच्या ठिकाणी सतर्क राहा. कामामध्ये अतिदक्षता बाळगा. आपल्या विचारांशी ठाम रहा. इतरांना मदत करून समाधान मिळेल.व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज (Horoscope Today)तुमचा व्यवसाय पुढे जाईल.
वृषभ : तुम्ही हाती घेतलेले काम आज मार्गी लागेल. आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काम करण्यास उत्साह असेल. आज कुटुंबासोबत दिवस व्यतीत कराल.
मिथुन : आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. कोणीही तुमचा गैरफायदा घेऊ शकतं. आज हातातील कलेचे कौतुक केले जाईल. बौद्धिक कौशल्य दाखवायला (Horoscope Today)मिळेल. कलाकार व्यक्तींसाठी आजचा दिवस छान जाईल.
कर्क : आज तुमच्या व्यवसायाला गती मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. आज बहिणीसाठी काहीतरी विशेष भेटवस्तु खरेदी कराल. घरात प्रसन्न वातावरण राहील. जोडीदारासोबतचे नाते बहरेल.
सिंह : आज नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस छान जाईल. आज तुमचे प्रमोशन होऊ शकते. त्यासोबतच तुम्हाला काम वाढवून देखील मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांबद्दल (Horoscope Today)बोलायचं तर, त्यांना आज नफाच नफा होईल.
कुंभ : आज तुम्ही तुमच्या मनासारख्या गोष्टी करण्यास खूप उत्सुक असाल. आजचा दिवस तुम्ही मनासारखा जगाल.आज तुमच्यावर धनवर्षाव होईल. महादेवाच्या कृपेने आज तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
News Title – Horoscope Today August 19
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार रोमँटिक टर्न!
मराठा आरक्षणाबाबत संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य!
रेखा यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, ‘मी तिघांसोबत…’






