Horoscope Today | आज 28 मार्च 2025 रोजी शुक्रवारचा दिवस असून, पंचांगानुसार हा दिवस काही राशींना विशेष शुभफलदायी ठरणार आहे. ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे आर्थिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक घडामोडी घडणार आहेत. चला जाणून घेऊया आजचे तुमचे राशीभविष्य. (Horoscope Today)
भगवान शंकराची कृपा असलेल्या पाच राशी
आजच्या शुक्रवारी मेष (Aries), वृषभ (Taurus), मिथुन (Gemini), सिंह (Leo) आणि कन्या (Virgo) राशींवर भगवान शंकराची विशेष कृपा राहणार आहे.
मेष राशीतील व्यक्तींना आर्थिक सुबत्ता लाभेल. पैशांची अडचण दूर होईल आणि आर्थिक नियोजन पूर्वपदावर येईल.
वृषभ राशीच्या तरुण-तरुणींना विवाहाचा योग जुळण्याची शक्यता असून, मनासारखा जोडीदार मिळेल.
मिथुन राशीच्या जातकांना कौटुंबिक वातावरण सुखद वाटेल. जुने वाद मिटतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वासाने भरलेला दिवस गाठेल. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल.
कन्या राशीच्या महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि स्वतःसाठी खरेदीचा योग येईल.
उर्वरित राशींसाठी संमिश्र दिवस
तूळ (Libra) राशीसाठी वैवाहिक सौख्यात काही प्रमाणात तडजोड करावी लागू शकते. मात्र, कलाकार वर्गाला महत्त्वाच्या संधी प्राप्त होतील.
वृश्चिक (Scorpio) राशीच्या जातकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कृतीला प्राधान्य दिल्यास यश प्राप्त होईल.
धनु (Sagittarius) राशीच्या लोकांनी निर्णय घेताना घाई करू नये. (Horoscope Today)
मकर (Capricorn) राशीच्या मुलींनी आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवावे आणि चिंता टाळण्याचा प्रयत्न करावा.
कुंभ (Aquarius) राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
मीन (Pisces) राशीच्या जातकांनी भावकीतील वाद आणि फसवणुकीपासून सावध राहावे.
Title : Horoscope Today 28 March 2025






