आजचे राशीभविष्य 22 मार्च 2025 : शीतला अष्टमीला ‘या’ राशींचं नशीब उजळणार, मनोकामना होतील पूर्ण

On: March 22, 2025 7:20 AM
---Advertisement---

Horoscope Today | आज शीतला अष्टमीचा शुभ दिवस असून देवीच्या कृपेने काही राशींवर विशेष आशीर्वाद राहणार आहेत. धार्मिकतेने भारलेल्या या दिवशी ग्रह-नक्षत्रांची अनुकूल साथ काहींना दिलासा देईल तर काहींना योग्य सावधगिरीची गरज भासेल. (Horoscope Today)

आजचे राशीभविष्य 

शुक्रवारी शीतला अष्टमी निमित्त देवीची पूजा करून शिळं अन्न अर्पण करण्याची परंपरा आहे. या दिवशी अष्टमी तिथी सकाळी 5:24  वाजेपर्यंत आहे. व्यतिपात योग सायंकाळी 5:35 वाजेपर्यंत असून मूळ नक्षत्र रात्री 3:24 पर्यंत प्रभावी राहील. या योगात देवीची पूजा, नामस्मरण व तर्पण केल्यास इच्छित फळ लाभते.

मेष व सिंह रास 

मेष (Aries) आणि सिंह (Leo) राशीच्या लोकांना आज त्यांच्या ध्येयात यश मिळू शकते. तुमच्या कामगिरीत प्रगती होईल व एखाद्या मनोकामनेची पूर्तता होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास 

वृषभ (Taurus) राशीच्या लोकांची सामाजिक छाप पडेल. आर्थिक व कौटुंबिक कामे सुरळीत पार पडतील.

कर्क, मिथुन व कन्या

कर्क (Cancer), मिथुन (Gemini) आणि कन्या (Virgo) राशींना मानसिक तणावापासून दूर राहावं लागेल. आपल्या जोडीदाराशी संवाद साधणे व वरिष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. (Horoscope Today)

वृश्चिक व तूळ रास 

वृश्चिक (Scorpio) आणि तूळ (Libra) राशींना प्रवासात व घरगुती निर्णयात संयम राखावा लागेल.

धनू रास 

धनु (Sagittarius) राशीच्या लोकांना कायदेशीर कामकाजात वेळ खर्च करावा लागू शकतो. आज तुमची हातात घेतलेली कामे पूर्ण होतील. त्यामुळे समाधानी असाल.

मकर रास 

तर मकर (Capricorn) राशीला अडचणींवर मात करत मार्ग काढता येईल.

कुंभ व मीन रास 

कुंभ (Aquarius) राशीला उत्तम वाहन सौख्य, मुलांशी सुसंवाद व धार्मिक यात्रेचा योग लाभेल. तर मीन (Pisces) राशीने श्रमाचे भान ठेवून योग्य मार्गदर्शन घ्यावे.

Title:  Horoscope Today 22 March 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now