आजचे राशीभविष्य 21 मार्च 2025 : बाप्पाचा ‘या’ 3 राशींवर राहणार आशीर्वाद 

On: March 21, 2025 7:27 AM
Dominating Zodiac Signs
---Advertisement---

Horoscope Today | आज शुक्रवार, 21 मार्च 2025 असून ग्रहांची हालचाल आणि पंचांगानुसार आजचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ, तर काहींसाठी संयमाचा इशारा करणारा आहे. मेष, सिंह आणि धनु या राशींवर बाप्पाचा विशेष आशीर्वाद राहणार आहे. पाहूया तुमचं आजचं राशीभविष्य. (Horoscope Today)

आजचे राशीभविष्य 

मेष (Aries)

आज तुम्ही अतिविचार टाळण्याचा प्रयत्न कराल. खर्चावर नियंत्रण ठेवूनही, स्वतःसाठी वेळ देण्याची भावना जागृत होईल. आत्मविश्वास वाढेल.

वृषभ (Taurus)

आर्थिक नियोजन उत्तम होईल, पण परिणाम दिसायला थोडा वेळ लागेल. संयम ठेवा. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस तटस्थ ठेवावा.

मिथुन (Gemini)

आज जबाबदाऱ्या झटकण्याचा मोह होऊ शकतो. महिलांना थोडं मानसिक अस्थैर्य जाणवेल. आत्मचिंतन आवश्यक.

कर्क (Cancer)

तुमच्या कामाच्या गुणवत्तेपेक्षा इतरांच्या अपेक्षा महत्त्वाच्या ठरतील. स्वतःवर ताण न आणता समजूतदारपणे वागा.

सिंह (Leo)

आज तुमच्या यशाचं कौतुक होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वधारेल. बाप्पाचा आशीर्वाद राहणार, त्यामुळे मन आनंदी राहील. (Horoscope Today)

कन्या (Virgo)

चिकाटी कमी होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कामात सातत्य ठेवणं गरजेचं आहे.

तूळ (Libra)

मानापमानाच्या भावना तीव्र होतील. महिलांनी विशेषतः रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. आज तोंडातून पडणाऱ्या शब्दांवर संयम ठेवा.

वृश्चिक (Scorpio)

पैशाची आवक चांगली असली तरी उधळपट्टीमुळे ताळमेळ बिघडू शकतो. फाजील खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या.

धनु (Sagittarius)

आज तुमच्यात नवीन सुरुवातीची ऊर्जा भरलेली असेल. व्यवसायात किंवा कामात नवीन प्रकल्पांना गती मिळेल. बाप्पाचा आशीर्वाद लाभणार.

मकर (Capricorn)

काम पूर्णत्वाला नेण्यासाठी चिकाटी ठेवावी लागेल. आधी सुरू केलेली कामं पूर्ण करा, नवीन कामात विलंब करू नका. (Horoscope Today)

कुंभ (Aquarius)

आज तुमची भावनिकता वाढेल. महिलांनी अति विचार करणे टाळावे. मन:शांतीसाठी ध्यान आणि योगाचा सल्ला दिला जातो.

मीन (Pisces)

विश्वास ठेवण्याआधी पारखून घ्या. जवळच्या लोकांबाबत धोका संभवतो. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगा.

Title : Horoscope Today 21 March 2025

 

Join WhatsApp Group

Join Now