आजचे राशीभविष्य 20 मार्च 2025 : वज्र योगात 12 पैकी ‘या’ राशींचं नशीब उजळणार!

On: March 20, 2025 7:30 AM
Today Horoscope
---Advertisement---

Horoscope Today | आजचा दिवस (20 मार्च 2025) राशींमध्ये अनेक बदल घडवणारा ठरेल. आज फाल्गुन कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून ती दुपारी 2:46 पर्यंत राहील. संध्याकाळी 6:20 पर्यंत वज्र योगाचा प्रभाव राहील, त्यामुळे काही राशींना मोठे आर्थिक लाभ तर काहींना नवीन संधी मिळतील. अनुराधा नक्षत्र रात्री 11:32 पर्यंत जागृत असेल. आजचा दिवस कोणासाठी शुभ आणि कोणासाठी सावधगिरी बाळगण्याचा आहे, जाणून घेऊयात.  (Horoscope Today)

आजचे राशीभविष्य 

मेष (Aries)

कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. खाण्या-पिण्याची हौस पूर्ण कराल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. गायन कलेत प्रगती होईल. नवीन वस्त्र खरेदी कराल.

वृषभ (Taurus)

आवडत्या कामात वेळ घालवाल. दिवस आनंदात व्यतीत होईल. महिलांना नटण्या-मुरडण्याची संधी मिळेल. घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल.

मिथुन (Gemini)

मानसिक स्थैर्य राखा. ज्येष्ठांची सेवा मनापासून कराल. अनपेक्षित संधी चालून येईल. दानधर्म करण्याचा योग येईल. प्रवासाची शक्यता आहे.

कर्क (Cancer)

समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. मित्रपरिवारात विस्तार होईल. चांगल्या वाहनाचा लाभ होईल. कार्यस्थळी स्त्रियांची मदत मिळेल. मुलांकडून शुभवार्ता येईल. (Horoscope Today)

सिंह (Leo)

कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. स्थिरता राखा. व्यावसायिक लाभ होईल. कार्यस्थळी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. दिवस समाधानकारक राहील.

कन्या (Virgo)

धार्मिक कार्यात प्रगती होईल. योग्य मार्गदर्शन मिळेल. नव्या संधी मिळतील. मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवा. तुमच्या चांगल्या स्वभावाची प्रशंसा केली जाईल.

तूळ (Libra)

अचानक धनलाभाची शक्यता आहे. काही गोष्टी सहज पार पडतील. आळसामुळे वेळ दवडू नका. हुरळून जाण्याऐवजी सतर्क राहा.

वृश्चिक (Scorpio)

वैवाहिक जीवनात आनंद राहील. मौजमजेत दिवस घालवाल. भागीदारीतून फायदा होईल. तुमचे सामाजिक संपर्क वाढतील. प्रतिष्ठा उंचावेल.

धनू (Sagittarius)

कामात काही किरकोळ अडचणी येऊ शकतात. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा होईल. आरोग्यात सुधारणा होईल.

मकर (Capricorn)

बुद्धीचा योग्य उपयोग कराल. शैक्षणिक प्रगती होईल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. मित्रमंडळींसोबत वेळ घालवाल. (Horoscope Today)

कुंभ (Aquarius)

सुखद झोप मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. दिवस सौख्यात जाईल.

मीन (Pisces)

प्रवासाची संधी मिळेल. वैचारिक स्पष्टता येईल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचे प्रेम मिळेल.

Title : Horoscope Today 20 March 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now