Horoscope Today | आज १८ एप्रिल २०२५ शुक्रवारी काही राशींना देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभणार आहे. पंचमी तिथी, ज्येष्ठा नक्षत्र आणि परिघ योगामुळे विशिष्ट राशींना यश, संपत्ती आणि मानसिक समाधान प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जाणून घ्या, तुमचं नशीब आज कसं असणार आहे. (Horoscope Today)
आज चैत्र शुद्ध पंचमी तिथी संध्याकाळी ५.०८ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर षष्ठी तिथी लागेल. आज ज्येष्ठा नक्षत्र सकाळी ८.२१ वाजेपर्यंत सक्रिय असेल, तर परिघ योग दुपारी १.०३ वाजेपर्यंत राहील. यामुळे दिवसभरात शुभ कार्यांसाठी चांगला मुहूर्त आहे. राहू काळ मात्र १०.३० ते १२ या वेळेत असल्यामुळे या वेळेत महत्त्वाची कामे टाळावीत.
आजचे राशीभविष्य
सिंह (Leo) राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात चांगली संधी मिळेल. तुमच्या अंगी असलेली कला आणि प्रतिभा यांची दखल घेतली जाईल. शारीरिक थकवा जाणवला तरी उत्साह कायम राहील. वडीलधाऱ्यांकडून मिळणाऱ्या सल्ल्याचा उपयोग होईल. नवीन प्रवासाच्या इच्छेला पूर्णत्व मिळू शकते.
वृश्चिक (Scorpio) राशीच्या लोकांना आज कामात उत्साह आणि वेग दोन्ही जाणवेल. जोखीम पत्करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कमी वेळेत काम पूर्ण करण्यावर भर द्या. मनातील अनाठायी चिंता बाजूला सारल्यास मानसिक शांती मिळेल. भावंडांशी स्नेह वृद्धिंगत होईल आणि त्यांच्या गरजांना प्रतिसाद द्यावा लागेल.
धनू (Sagittarius) राशीसाठी आज यशाचं दार उघडणार आहे. हातातील कामात समाधानकारक प्रगती होईल. घरातील सौख्य जपण्यासाठी प्रयत्न करावेत. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादापासून लांब राहिल्यास परिस्थिती अनुकूल होईल. कायदेशीर बाबी हाताळताना दक्ष राहा, पण आजचा दिवस सरळ मार्गाने यश मिळवून देणारा ठरेल.
इतर राशींची स्थिती कशी असणार?
मेष (Aries) : राशीतील व्यक्तींना मनाची चंचलता जाणवेल. परंतु आत्मविश्वास आणि तत्परता यामुळे कामे यशस्वी होतील.
वृषभ (Taurus) : राशीतील लोकांनी अनाठायी खर्च आणि चोऱ्यांपासून सावध राहावं. विचारांमध्ये स्थिरता आवश्यक आहे.
मिथुन (Gemini) : राशीतील लोकांनी तब्येतीकडे लक्ष द्यावं. घरातील सीनियर सदस्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल.
कर्क (Cancer) : राशीतील लोकांनी भावनांवर नियंत्रण ठेवावं. जोडीदाराच्या प्रगतीचा आनंद मिळेल.
कन्या (Virgo) : राशीतील लोकांना भावंडांची काळजी लागून राहील. घरातील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.
तूळ (Libra) : राशीतील लोकांनी घरगुती बदल आणि भागीदारीत लक्ष द्यावं. धार्मिक वाचन उपयुक्त ठरेल. (Horoscope Today)
मकर (Capricorn) : राशीतील लोकांनी मतभेद टाळावेत, आणि प्रवासात काळजी घ्यावी.
कुंभ (Aquarius) : राशीतील लोकांवर कामाचा ताण वाढेल, पण वरिष्ठ समाधानी राहतील.
मीन (Pisces): राशीतील लोकांना घरातील वातावरण आनंददायी वाटेल, आणि कलागुणांना वाव मिळेल.
Title : Horoscope Today 18 April 2025






