2025 मध्ये ‘या’ 4 राशींना शनी बनवणार धनवान

On: October 27, 2024 10:36 AM
Horoscope
---Advertisement---

Horoscope | ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीला (Shani Dev) कोणत्याही राशीत स्थिर राहण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनीला न्यायाधीश आणि दंडाधिकारी म्हणतात. जी व्यक्ती चांगलं कर्म करते अशा व्यक्तींना शनी (Lord Shani) चांगलं फळ देतात.

शनीने 2023 मध्ये कुंभ राशीत प्रवेश केला होता ते 2025 पर्यंत शनी कुंभ राशीतून निघनू मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत प्रवेश केल्यानंतर शनीची साडेसाती संपेल आणि मेष राशीत साडेसाती सुरु होईल. यामुळे कोणकोणत्या राशींवर (Horoscope) याचा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.

मेष रास- शनीच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होईल. मात्र, शनी जर द्वादश चरणात, सहाव्या आणि नवव्या चरणात असल्यामुळे शनीची पिडा होणार नाही. त्यामुळे या काळात तुम्ही शनीचे काही उपाय करुन साडेसाती दूर करु शकता. तसेच, या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला देखील जाण्याचा बेत करु शकता. तसेच, शनीची कृपा असल्यामुळे तुम्ही आर्थिक बाबतीत देखील संपन्न असाल.

कर्क- कर्क राशीच्या लोकांवर शनीच्या संक्रमणाचा काहीही परिणाम होणार नाही. या काळात तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात चांगलं यश मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापाराच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास, तुमचा व्यवसाय फार वेगाने चालेल. यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

तूळ रास- तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण असेल त्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार नाही. तसेच, शनीदेवाची कृपा असल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील. तसेच, कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल.

कुंभ रास -कुंभ राश ही शनीची रास असल्यामुळे या राशीच्या लोकांना लवकरच चांगले दिवस येतील. तसेच, तुमच्याधन-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या इच्छेनुसार, तुम्हाला फळ मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘बिग बाॅस’ फेम जान्हवी किल्लेकरने केला लिलाव?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

कसब्यातील भाजपचा उमेदवार ठरला; ‘हा’ नेता देणार धंगेकरांना टफ फाईट

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका!

शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर

“पोरं तरी कशी झाली…”; जयश्री थोरातांबद्दल भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now