Hinjawadi Metro | पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर (Shivajinagar) या २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो (Metro) प्रकल्पाचे काम ८२ टक्के पूर्ण झाले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हे काम हाती घेतले आहे. सप्टेंबर महिन्यात चाचणी घेऊन, त्रुटी दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे, ऑक्टोबर महिन्यात हिंजवडी मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. (Hinjawadi Metro)
स्थानकांवरील कामे अंतिम टप्प्यात
‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता रिनाज पठाण (Rinaj Pathan) यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानकांवरील सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने, एकाच टप्प्यात हिंजवडी ते न्यायालय या स्थानकांपर्यंत मेट्रो सुरू करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीला २३ स्थानकांवरील सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल), विद्युतयंत्रणा आणि इतर किरकोळ दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. लोहमार्गदेखील टाकण्यात आले आहेत.
सप्टेंबरमध्ये चाचणी, ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष सेवा?
भूसंपादन, परवानग्या, निविदा आणि कार्यारंभ आदेश आदी प्रक्रियेमुळे या मार्गाच्या कामाला विलंब झाला आहे. सध्या, बाणेर, सकाळनगर आणि सिव्हिल कोर्ट (Civil Court) आदी स्थानके; तसेच ११ स्थानकांवर सरकते जिने आणि इतर पायाभूत सुविधांची कामे प्रलंबित आहेत.
सप्टेंबर महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करून चाचणी घेण्यात येणार असल्याने, ऑक्टोबरपर्यंत या मार्गावरील मेट्रो प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. या मेट्रो मार्गावर २३.३ किलोमीटर लांबीची २३ स्थानके आहेत. प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, आसनक्षमता, व्यापारी संकुल, वाहनतळ आदी सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. (Hinjawadi Metro)
Title : Hinjawadi Metro in October 82 Percent Work Complete






