कुल्लूत दरड कोसळून मोठी दुर्घटना, तब्बल ‘इतक्या’ पर्यटकांचा जागीच मृत्यू

On: March 31, 2025 8:28 AM
Himachal Landslide in Kullu
---Advertisement---

Himachal Landslide | हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात रविवारी सायंकाळी दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. मणिकर्ण (Manikaran) येथील गुरुद्वारा परिसरात ही घटना घडली असून, अचानक कोसळलेल्या दरडीमुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले आणि सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Himachal Landslide)

गुरुद्वाराजवळ दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू

रविवारी संध्याकाळी सुमारे पाचच्या सुमारास कुल्लू (Kullu) येथील मणिकर्ण मार्गावरील गुरुद्वाराजवळ भूस्खलनाची घटना घडली. त्या वेळी काही पर्यटक आणि स्थानिक लोक रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली बसलेले असताना अचानक डोंगरावरून माती आणि दगडांचा मोठा ढीग खाली आला. या ढिगाऱ्याचा जोर झाडावर बसल्याने झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले आणि त्याखाली बसलेले लोक त्यात चेंगरले गेले.

या दुर्घटनेत एका स्टॉल चालकासह, सुमो गाडीत बसलेले दोन प्रवासी आणि तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.

वाहने अडकली, रस्ता बंद, शोधमोहीम सुरू

या भीषण भूस्खलनामुळे मणिकर्णकडे जाणारा प्रमुख मार्ग बंद झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर एक मोठे झाड रस्त्यावर आडवे झाले, ज्यामुळे तीन ते चार गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यामध्ये बसलेले प्रवासी आणि पर्यटक गंभीर जखमी झाले.   या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रस्त्यावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्यातील सहा जणांना मृत घोषित केले. अद्याप काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता असून, शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Title : Himachal Landslide in Kullu 6 Dead  

 

Join WhatsApp Group

Join Now