Hatchback Cars l देशभरात दर महिन्याला मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होते. एसयूव्ही आणि सेडान सेगमेंटच्या वाहनांसोबतच हॅचबॅक सेगमेंटच्या कारही अनेक कंपन्यांनी ऑफर केल्या आहेत. तर आज आपण एप्रिल 2024 मधील टॉप-5 हॅचबॅक कारबदलाची माहिती जाणून घेणार आहोत…
बाजारात या कारची क्रेझ :
Maruti Wagon R :
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने वॅगन आर ही हॅचबॅक कार भारतीय बाजारपेठेत बऱ्याच काळापासून आणली आहे. एप्रिल 2024 मध्ये, ही कार इतर हॅचबॅक कारच्या तुलनेत सर्वाधिक पसंत केली गेली आहे, परंतु तिच्या विक्रीत दरवर्षी 15 टक्के घट नोंदवली गेली आहे. गेल्या महिन्यात मारुतीच्या वॅगन आरच्या एकूण 17850 युनिट्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 20789 कारची विक्री केली होती.
Maruti Baleno :
एप्रिल 2024 मध्ये मारुतीची बलेनो सर्वाधिक पसंतीच्या हॅचबॅक कारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. कंपनीने एप्रिल 2024 मध्ये या हॅचबॅक कारच्या 14049 युनिट्सची विक्री केली. तर एप्रिल 2023 मध्ये या कारच्या एकूण 16180 युनिट्सची विक्री झाली. आकडेवारीनुसार, बलेनोच्या विक्रीत 13 टक्क्यांनी घट झाली आहे.
Hatchback Cars l ह्युंदाई i20 ने घातली ग्राहकांना भुरळ :
Maruti Alto :
मारुती अल्टोच्या विक्रीत घट झाली असेल, पण तरीही भारतात ती कार खूप पसंत केली जाते. गेल्या महिन्यात या हॅचबॅक कारच्या एकूण 9043 युनिट्सची विक्री झाली होती. तर गेल्या वर्षी ही कार 11548 ग्राहकांनी खरेदी केली होती.
Tata Tiago :
हॅचबॅक कारच्या विक्रीच्या यादीत टाटा टियागो देखील पुढे आहे. एप्रिल 2024 मध्ये ही कार 6796 ग्राहकांनी खरेदी केली होती. तर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्याची एकूण विक्री 8450 युनिट्स होती.
Hyundai i20 :
ह्युंदाईने या सेगमेंटमध्ये i20 कार ऑफर केली आहे. Hyundai i-20 विक्रीच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. एप्रिल 2024 मध्ये या हॅचबॅक कारच्या एकूण 5199 युनिट्सची विक्री झाली. एप्रिल 2023 मध्ये एकूण 6472 युनिट्सची विक्री झाली. विक्रीच्या बाबतीत, गेल्या महिन्यात या कारची विक्री 20 टक्के कमी झाली आहे.
News Title – Hatchback Cars In India
महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांची चिंता वाढली; अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार
मदर्स डे स्पेशल पाहा हे थ्रिलर चित्रपट; अंगावर येईल काटा
सुवर्णसंधी! बिग डिस्कॉउंटसह खरेदी करा ‘हा’ तगडा स्मार्टफोन
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ‘या’ उमेदवारांमध्ये होणार कांटे की टक्कर; जनतेचा कौल कोणाला?






