राजकीय भूकंप! भाजपचा ‘हा’ बडा नेता ‘तुतारी’ हाती घेणार?

On: October 3, 2024 6:01 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कारण इंदापूरचे भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली आहे. आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपला मोठा धक्का! :

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील भाजप पक्षाला राम राम करून तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. अशातच आता या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांचे पूत्र राजवर्धन पाटील यांनी आपल्या मोबाईल स्टेटला तुतारी हे चिन्ह ठेवले आहे.

मात्र आता राजवर्धन पाटील यांनी मोबाईलवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीचा स्टेटस ठेवल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या कित्येक दिवसापासून हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता राजवर्धन पाटील यांनी स्टेटस ठेवल्याने हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार हे जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे.

Maharashtra l इंदापूरची जागा अजित पवार गटाला?

विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा ही महायुतीकडून अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. मात्र या दरम्यान विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. मात्र या जागेवर भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे इच्छूक आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

मात्र आता इंदापूरमध्ये अजित पवार यांनी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिल्यास हर्षवधान पाटील हे शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळतील. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

News Title – Harshwardhan patil join NCP sharad pawar

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला केली स्थानिक नेत्यांनी मदत!

नवरात्रोत्सवात शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

‘हिंदू समाज हा महामूर्ख’ संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदेंना झुकतं माप; भाजपमध्ये नाराजीचे सुर?

खुशखबर ! महिंद्रा थार रॉक्सची बुकिंग सुरु; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now