Hardik Pandya Ferrari | भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या त्याच्या आलिशान जीवनशैलीमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) विजयाचा आनंद साजरा करत असतानाच हार्दिकने स्वतःला सुमारे 12 कोटींची कार खरेदी केली आहे. गर्लफ्रेंड माहिकाने त्याच्या या आलिशान कारची पूजा केली. या क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘फेरारी 12 सिलिंड्री’ (Ferrari 12 Cilindri) ही महागडी कार हार्दिकने खरेदी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक आपल्या नवीन “नीरो डायटोना ब्लॅक” फेरारीमध्ये बसलेला दिसतो, तर त्याची गर्लफ्रेंड Mahika Sharma गाडीसमोर पारंपरिक पद्धतीने पूजा करताना दिसते. टिळा लावणे, नारळ अर्पण करणे अशा विधींमुळे हा व्हिडिओ चाहत्यांना विशेष भावला आहे.
ही फेरारी केवळ लक्झरीच नाही तर परफॉर्मन्समध्येही जबरदस्त आहे. 6.5-लिटर V12 इंजिनसह ही कार 830 हॉर्सपॉवर निर्माण करते. केवळ 2.9 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास वेग गाठण्याची क्षमता आणि 340 किमी/तास टॉप स्पीडमुळे ही सुपरकार जगभर प्रसिद्ध आहे. आतमध्ये ट्रिपल डिस्प्ले सेटअप आणि प्रीमियम साउंड सिस्टीममुळे ती एक “मोबाईल कॉन्सर्ट हॉल”च वाटते.
Hardik Pandya girlfriend Mahieka Sharma was seen doing a traditional Pooja and tilak ceremony for their new car.
Hardik Pandya reportedly gifted a stunning Ferrari 12 cilindri worth ₹12cr to Mahieka, and happiness on their faces says it all.
pic.twitter.com/PFDDfjUI9s— Yash MSdian ™️ 🦁 (@itzyash07) March 18, 2026
या पूजेदरम्यान माहिकाने गाडीला टिळा लावून आणि नारळ वाढवून भारतीय परंपरेनुसार नवीन वाहनाचे स्वागत केले. काही दिवसांपूर्वीच हे जोडपे मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांवर याच सुपरकारमधून फिरताना दिसले होते, ज्याचे छायाचित्रे समाजमाध्यमांवर आधीच चर्चेचा विषय ठरली होती. आता या पूजेच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मैदानावरच्या पराक्रमासोबतच हार्दिकची लाइफस्टाईलही नेहमी चर्चेत असते. मात्र, यावेळी Hardik Pandya आणि Mahika Sharma यांची केमिस्ट्री आणि पारंपरिक पूजेचा टच यामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर ट्रेंड होत आहे.






