लग्नाआधी टोकाचं पाऊल, शिरीष महाराजांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय?

On: February 5, 2025 4:06 PM
H.B.P. Shirish Maharaj More Dies by Suicide  Suicide Note Reveals Shocking Reason
---Advertisement---

Shirish Maharaj More | देहू नगरीतून एक अत्यंत दु:खद आणि हादरवून टाकणारी घटना समोर येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेले प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी आज (5 फेब्रुवारी) सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अवघ्या 20 दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या आणि येत्या 20 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध होणार्‍या शिरीष महाराजांनी वयाच्या 30 व्या वर्षी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारणाचा उलगडा करणारी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रात्री जेवण केले आणि सकाळी घेतला गळफास:

मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. मंगळवारी रात्री जेवणानंतर ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, आज सकाळी बराच वेळ होऊनही त्यांनी दार न उघडल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा मृतदेह खोलीत उपरण्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Shirish Maharaj More  | आत्महत्येचे कारण ठरली ‘ही’ विवंचना

शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या का केली, याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या टोकाच्या निर्णयामागील कारण स्पष्ट केले आहे. उदरनिर्वाहासाठी ते प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे इडलीचे उपहारगृह देखील होते. मात्र, त्यातून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. येत्या 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह होणार होता. मात्र, हलाखीची आर्थिक परिस्थिती आणि उदरनिर्वाहाची चिंता यातून त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे या सुसाईड नोटमधून समोर आले आहे.

आज होणार अंत्यसंस्कार:

शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देहू नगरी आणि वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून, आज संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पोलिसांचा तपास सुरू:

या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Title :  H.B.P. Shirish Maharaj More Dies by Suicide  Suicide Note Reveals Shocking Reason

 

Join WhatsApp Group

Join Now