Gunaratna sadavarte | ‘राज ठाकरे मालक झालाय का? राज ठाकरेंचं कर्तुत्व काय?’, गुणरत्न सदावर्तेंचा खोचक सवाल

On: January 27, 2024 4:25 PM
Gunaratna sadavarte on Raj Thackeray
---Advertisement---

Gunaratna sadavarte | राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. शिंदे सरकारने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आंदोलक मनोज जरांगे यांचं कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna sadavarte) यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मराठा आंदोलनामुळे तुमची सुरक्षा वाढवण्यात आली. तुमच्यावर दर महिन्याला 20 लाख रुपये खर्च होतोय, तुम्ही सरकारचे जावई आहात काय?, असा सवाल मनसेने केला होता. यावरच बोलताना गुणरत्न सदावर्तेंनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी मनसेला थेट आव्हानही दिलं आहे.

“माझ्यावर टीका करण्याऐवढे ते एवढे मोठे..”

माझ्यासमोर राज ठाकरे वन टू वन, समोरा समोर येऊ द्या, मग मी काय ते सांगतो. असे छोटे नेते, कार्यकर्ते बोलत असतील, तर मी रागवणार नाही, असं सदावर्ते (Gunaratna sadavarte) म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

राज ठाकरे मालक झालाय का? त्यांचं कर्तुत्व तरी काय? पार्श्वभूमी काय? असं बोलायला गेलो, तर मी बरंच बोलू शकतो. पण आज तो विषय नाही. आज ती वेळ नाही. त्यांनी टोल नाके बघावेत, सरकारला शहाणपण शिकवू नये. माझ्यावर टीका करण्याऐवढे ते एवढे मोठे नाहीत, असा टोलाही सदावर्ते यांनी मनसेला लगावला. यावेळी सदावर्ते यांनी मराठा आरक्षणावरही प्रतिक्रिया दिली.

“खजूर खाऊन, दुध पिऊन आंदोलन होत नाही”

मनोज जरांगे यांच्यावर टीका करत सदावर्ते (Gunaratna sadavarte) म्हणाले की, “मराठा समाज हा काय समाजिक मागास नाही. खजूर खाऊन, दुध पिऊन आंदोलन होत नाही. ही काय राजकीय निवडणूक होती का? गुलाल उधळण्यासाठी, याला राजकीय स्वरूप देऊ नका. थोडं थांबा कारण, सर्वांना दुध का दुध आणि पाणी का पाणी काय ते कळेल, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सगळ्यांना कायद्याच्या आतच राहावं लागतं. रक्ताच्या नात्यातील लोकांना प्रमाणपत्रासाठी शपथपत्र देण्याची कायद्यात तरतूद आहेच. त्यामुळे यात खूप काही असं नवीन नाही. न्यायालयाच्या निकालानंतर जे जे प्रतिबंध घालण्यात येतात त्याचं पालन करावचं लागतं, असंही सदावर्ते म्हणालेत.

News Title :  Gunaratna sadavarte on Raj Thackeray

महत्वाच्या बातम्या- 

Bigg Boss 17 | फिनालेपूर्वीच ‘बिग बॉस’च्या विजेत्याचा खुलासा?, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षण अजिबात टिकणार नाही?’, सरकारमधील मंत्र्यानेच बोलून दाखवलं

Maratha Reservation | सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य; छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

Maratha reservation GR | ‘…तरच मिळणार कुणबी प्रमाणपत्र’; जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

Manoj Jarange | मुख्यमंत्र्यांसमोरच मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य!

Join WhatsApp Group

Join Now