Spam Calls l कित्येकदा घाईच्या कामात नागरिकांना स्पॅम कॉल येतो आणि मग नागरिकांची चिडचिड होते. पण आता या त्रासापासून सुटका होणार आहे. आता सरकार स्पॅम कॉल्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम तयार करत आहे. असे मानले जाते की नवीन मार्गदर्शक तत्त्वे कठोर असतील आणि स्पॅम कॉलला प्रतिबंध करतील. अलीकडेच दूरसंचार क्षेत्रातील नियामक ट्रायने सर्व कंपन्यांना फोनवर कॉल करणाऱ्याचे नाव दाखवण्याचे निर्देश दिले होते. तसेच सर्व स्मार्टफोन उत्पादकांना अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
बेकायदेशीर कॉलला आळा बसणार :
बेकायदेशीर मार्केटिंग कॉलला आळा घालण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने या वर्षाच्या सुरुवातीला एक समिती स्थापन केली होती. या समितीने नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे. 10 मे रोजी झालेल्या बैठकीत या मसुद्यावर चर्चा झाली. या बैठकीत ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे, दूरसंचार विभाग, ट्राय, सेल्युलर असोसिएशन ऑफ इंडिया, बीएसएनएल, व्होडाफोन, रिलायन्स आणि एअरटेलचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यात अनेक अटी जोडण्यात आल्या आहेत. याशिवाय अवैध कॉल्स आणि मेसेजची व्याख्याही निश्चित करण्यात आली आहे. असे कॉल आणि मेसेज रोखण्यासाठी समितीला अनेक शिफारशी मिळाल्या होत्या. मसुदा तयार करताना या बाबीही लक्षात ठेवण्यात आल्या आहेत. आता ग्राहक व्यवहार विभागाला या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता द्यावी लागणार आहे.
Spam Calls l स्पॅम कॉल पूर्णपणे बंद करणे आवश्यक :
या समितीने मान्य केले आहे की, असे कॉल आणि संदेश ग्राहकांना त्रासदायक आणि दिशाभूल करणारे आहेत. ते पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. ट्राय आणि दूरसंचार विभागाच्या सर्व प्रयत्नांनंतरही ते आजपर्यंत त्यांना रोखू शकलेले नाहीत.
समितीने बँका, वित्तीय कंपन्या, विमा कंपन्या आणि ट्रेडिंग कंपन्यांना डिजिटल कन्सेंट ऍक्विझिशन सिस्टम विकसित करण्यास सांगितले आहे. या अंतर्गत ग्राहक स्वत: ठरवू शकतील की त्याला व्यावसायिक संवाद घ्यायचा आहे की नाही. त्यामुळे आता लवकरच बेकायदेशीर मार्केटिंग कॉलला आळा बसणार आहे.
News Title – Guidelines on Spam Call
महत्त्वाच्या बातम्या –
शेतकऱ्यांनो तयारीला लागा; राज्यात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार
आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत घसरण; जाणून आजचे दर
महाराष्ट्रात पुन्हा पाय पसरतोय कोरोना, पुणेकरांसाठी धोक्याची घंटा
बाईक लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक लाँच
…असं करायला उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? ‘या’ बड्या नेत्यानी काढली ठाकरेंची इज्जत






