Gowardhan Asrani | ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. 20 ऑक्टोबर रोजी मुंबईतील रुग्णालयात वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी यांना गेल्या 15-20 दिवसांपासून अशक्तपणा जाणवत होता. काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Gowardhan Asrani) असरानी यांच्या अकाली निधनानं चाहते आणि कलाकारांनाही धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.
घाईत का केले अंत्यसंस्कार ?
मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात दुपारी 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फुफ्फुसांत पाणी झाले होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री 8 वाजता तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार इतक्या घाईत का केले, याबाबत त्यांचे मॅनेजर बाबूभाई थीबा यांनी खुलासा केला. ते म्हणाले, त्यांच्या पत्नी मंजू असरानी यांनी मला सांगितले की, सर्वकाही शांततेत पार पाडा, कोणालाही काही सांगू नका, अशी असरानी यांची इच्छा होती.” (Gowardhan Asrani)
Asrani Death | असरानी यांची कारकीर्द
असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूरमध्ये झाला. त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. असरानी यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ‘शोले’ मधील जेलरच्या भूमिकेमुळे ते विशेष प्रसिद्ध झाले.
असरानी यांच्या पत्नीचे नाव मंजू बंसल आहे, त्याही एक अभिनेत्री आहेत. असरानी आणि मंजू यांना मुलबाळ नाही. त्यांनी विविध सिनेमात एकत्र काम केलेले. 1 जानेवारी 1941 रोजी जयपूरमध्ये जन्मलेल्या असरानी यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी अभिनय कारकिर्दीमध्ये 350 हून अधिक सिनेमात काम केले होते. (Gowardhan Asrani)






