गोविंदा आणि पत्नी सुनिता यांचा घटस्फोट होणार नाही!, वकिलांचा मोठा खुलासा

On: February 26, 2025 5:32 PM
Govinda-Sunita Not Getting Divorced Lawyer Confirms
---Advertisement---

Govinda-Sunita | बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda-Sunita) आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. ३८ वर्षांच्या संसारानंतर दोघं वेगळे होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तसेच, गोविंदाचे एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, आता गोविंदाच्या वकिलांनी या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे.

घटस्फोट होणार नाही?, वकिलांनी सांगितले सत्य

गोविंदा आणि सुनिता यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली, तरी गोविंदाचे वकील आणि फॅमिली फ्रेंड ललित बिंदल (Lalit Bindal) यांनी दिलेल्या मुलाखतीत सत्य स्पष्ट केले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, “सुनिता आहुजाने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यानंतर परिस्थिती सुधारली आणि आता ते दोघं पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालं आहे.”

गोविंदा आणि सुनिता अजूनही एकत्रच

वकिलांच्या या खुलाशानंतर, गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, दोघांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

सध्या गोविंदा आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. गोविंदा आणि सुनिता आहुजाच्या लग्नाला ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना टीना (Tina Ahuja) आणि यशवर्धन (Yashvardhan Ahuja) अशी दोन मुलं आहेत.

Title: Govinda-Sunita Not Getting Divorced Lawyer Confirms

 

Join WhatsApp Group

Join Now