गोविंदा-सुनीता अहुजा यांच्यात पुन्हा वाद? फॅमिली कोर्टाबाहेर सुनीताला पाहून चाहते चिंतेत!

On: August 19, 2026 2:47 PM
Govinda Sunita Ahuja
---Advertisement---

Govinda Sunita Ahuja | बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या 37 वर्षांच्या वैवाहिक नात्याबाबत पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे. मुंबईतील फॅमिली कोर्टाबाहेर सुनीता मुलगा यशवर्धनसोबत दिसल्यानंतर त्यांच्या नात्यातील तणावाला कायदेशीर स्वरूप आले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोर्टाबाहेरील त्यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही विविध चर्चांना वेग आला आहे.

फॅमिली कोर्टाबाहेर सुनीता आणि यशवर्धन :

बुधवारी सकाळी सुनीता अहुजा मुलगा यशवर्धनसोबत मुंबईतील कौटुंबिक न्यायालयातून बाहेर पडताना दिसल्या. त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर नेहमीपेक्षा वेगळे भाव जाणवत होते. सुनीता साधारणपणे पापाराझी आणि माध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधताना दिसतात. मात्र यावेळी त्या शांत राहिल्या आणि काहीशा तणावाखाली असल्याचे व्हिडीओमध्ये जाणवले. त्यामुळे त्यांच्या कोर्टातील उपस्थितीचा संबंध वैवाहिक वादाशी आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सुनीता आणि यशवर्धन गाडीच्या दिशेने जात असताना पापाराझींनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर यशवर्धनने माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहत फोटो काढू नयेत, अशी विनंती केली. मात्र पापाराझी मागे हटले नाहीत. त्यामुळे यशवर्धन नाराज झाला आणि त्याने काहीशा संतापलेल्या स्वरात प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी सुनीता यांनीही, ‘कोर्टात मी केक कापायला आले होते’, असा उपरोधिक टोला लगावत तेथून निघून जाणे पसंत केले.

Govinda Sunita Ahuja | गोविंदा-सुनीता यांच्या नात्यातील जुना तणाव :

गोविंदा आणि सुनीता यांच्या वैवाहिक नात्यात मतभेद असल्याच्या चर्चा मागील काही काळापासून सुरू आहेत. सोशल मीडिया पोस्ट तसेच विविध मुलाखतींमध्ये दोघांकडूनही एकमेकांना उद्देशून टोमणे मारले जात असल्याचे बोलले जात होते.

सुनीता यांनी यापूर्वी गोविंदावर विश्वासघात केल्याचे तसेच विवाहबाह्य संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी गोविंदा राणी स्वर्णकार (Rani Swarnakar) हिच्यासोबत विमानतळावर दिसला होता. विशेष म्हणजे, पापाराझींसमोर त्याने तिची स्वतः ओळख करून दिली. या प्रसंगानंतर गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा रंगली.

News title : Govinda-Sunita Ahuja Court Appearance

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now