गोविंदाची भाची रागिणी खन्नाचा धक्कादायक खुलासा!

On: May 3, 2024 8:04 PM
Ragini Khanna
---Advertisement---

Ragini Khanna | बॉलिवूडचा अभिनेता गोविंदाची भाची कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती आपल्या टेलिव्हिजनवरील मालिकांमधून लोकांच्या घराघरामध्ये पोहोचली आहे. तिला प्रसिद्धी मिळाली आहे. आपली बहीण आरती सिंहच्या विवाहापासून ती अधिक चर्चेत आली. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलीये. रागिनी (Ragini Khanna) असं अभिनेत्रीचं नाव असून ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. तिनं नुकताच सोशल मीडियावर एक धार्मिक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर तिने तो व्हिडीओ डिलीट करत पुन्हा हिंदू धर्माविषयीचा व्हिडीओ शेअर केला. (Ragini Khanna)

रागिनीने (Ragini Khanna) आपल्या सोशल मीडियाच्या इन्स्टा आयडीवर ख्रिश्चन धर्माबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तिनं ख्रिश्चन धर्म स्विकारल्याची माहिती तिनं आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. हे पाहूण चाहते देखील चक्रावले होते. मात्र पुन्हा ती पोस्ट डिलीट केली. ख्रिश्चन धर्माच्या धर्मांतराची पोस्ट शेअर करून 24 तासही पूर्ण होत नाही तोवर तिनं ती पोस्ट डिलीट केली.

काय होती ख्रिश्चन धर्माविषयी पोस्ट?

तिनं पोस्टमध्ये लिहिलं की मी यापुढे ख्रिश्चन धर्माचं पालन करणार आहे. पोस्ट अपलोड करून 24 तास होत नाही तोवर रागिनीने धर्मांतराची पोस्ट डिलीट केली. त्यानंतर तिनं हिंदू धर्माविषयी पोस्ट केली.

“मी कट्टर हिंदू”

नव्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, हाय, मी रागिनी खन्ना (Ragini Khanna) आहे. माझ्या मागील व्हिडीओबाबत मी माफी मागते. मी ख्रिश्चन धर्म स्विकारण्याचा निर्णय घेतला होता आता मी पुन्हा एकदा मूळ धर्माकडे आली आहे. मी कट्टर हिंदू बनली आहे. सनातन मार्ग स्विकारला आहे, असं रागिनी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by watchman (@chukidarbhadur2.0)


रागिनीची पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी रागिनीचं अकाऊंट कोणी हॅक केलं आहे का?, असा सवाल केला आहे. मात्र रागिनीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तिच्या ख्रिश्चन धर्म स्विकारण्यावर कोणीतरी तिचं अकाऊंट हॅक केलं असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं.

रागिनीने आतापर्यंत ‘देख इंडिया देख’, ‘भास्कर भारती’, ‘ससुराल गेंदा फूल’, ‘गुड मॉर्निंग विद रागिनी खन्ना’ यांसारख्या शोजमध्ये काम केलंय. तिने काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

News Title – Govinda Niece Ragini Khanna Converting Christianity Post Viral

महत्त्वाच्या बातम्या

‘आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही…; उद्धव ठाकरे संतापले

‘या’ तीन बँका करतील मालामाल; एका वर्षाच्या FD वर देतात तगडं व्याज

मान्सूनमध्ये मुंबईवर भरतीचं सावट, मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा

पती-पत्नीमधील प्रेमाचा गोडवा हिरावतील ‘या’ चुका; आत्ताच व्हा सावध

‘नमाज पडणारे काही लोक दलाल आहेत’; ठाकरे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Join WhatsApp Group

Join Now