सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 75 हजार पगार मिळणार, पाहा पात्रता आणि अर्ज करण्याची प्रोसेस 

On: April 28, 2025 7:58 AM
Government Job Alert  BIS Recruitment 2025 
---Advertisement---

BIS Recruitment 2025 | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. (BIS Recruitment 2025)

भारतीय मानक ब्युरोने (BIS) १९ एप्रिल २०२५ पासून सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी उमेदवार ९ मे २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज फक्त BIS च्या अधिकृत वेबसाईटवर (bis.gov.in) ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांनी ही संधी हातातून जाऊ देऊ नये.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे B.Sc, B.Tech, B.E, BNYS किंवा कृषीशास्त्र/मृदा विज्ञान यामध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय कमाल ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. त्यामुळे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पूर्ण करणारे उमेदवार लगेच अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया आणि पगार

उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे शॉर्टलिस्ट करून केली जाईल. यानंतर निवडलेल्या उमेदवारांना तांत्रिक मूल्यमापन आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची एक वर्षासाठी करारावर नेमणूक केली जाईल. विशेष म्हणजे, या सल्लागार पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा तब्बल ७५,००० रुपयांचा पगार दिला जाईल.

अर्ज प्रक्रिया कशी कराल?

सर्वप्रथम BIS च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

मुख्यपृष्ठावरील “भरती” विभागात जा आणि संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.

“खाते तयार करा” या पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.

लॉग इन करून अर्ज फॉर्म पूर्णपणे भरा.

सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.

शेवटी अर्जाचा प्रिंटआउट काढून आपल्या जवळ ठेवा.

९ मे २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. उशीराने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Title: Government Job Alert  BIS Recruitment 2025  

 

Join WhatsApp Group

Join Now