सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश! केंद्र सरकारचा धक्कादायक निर्णय, 47 अधिकारी तडकाफडकी बडतर्फ!

On: July 24, 2026 8:31 PM
NEET Paper Leak
---Advertisement---

NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या संतप्त वातावरणात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयानुसार तब्बल 47 अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या घडामोडीमुळे प्रशासकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली असून, कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नीट प्रकरणानंतर सरकारचा मोठा निर्णय :

नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि अखेर संबंधित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात आली. या संपूर्ण घडामोडींमुळे शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक जोर धरू लागली. गेल्या महिनाभरापासून दिल्ली (Delhi) येथील जंतर मंतर (Jantar Mantar) परिसरात कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनानंतर आता केंद्र सरकारने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. सरकारने एकाच वेळी 47 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याने विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे.

NEET Paper Leak | आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेला तणाव :

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. परीक्षा रद्द झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या, त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले. यानंतर नव्याने परीक्षा घेण्यात आली असली तरी या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलेच राहिले.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने जंतर मंतर येथे सुरू केलेले आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा घेतलेला निर्णय या आंदोलनाशी जोडून पाहिला जात आहे.

News Title: Government Dismisses 47 Officials

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now