सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे लेटेस्ट रेट

On: June 26, 2026 1:29 PM
Gold Rates
---Advertisement---

Gold Silver Rate | आज शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Rate Today) पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील विक्रीचा सपाटा आणि व्याजदरांबाबत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने (US Fed) घेतलेली कडक भूमिका यामुळे गेल्या २-३ दिवसांपासून बाजारावर कमालीचा दबाव आहे. याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर झाला असून किमती सातत्याने खाली येत आहेत.

आजचे सोने आणि चांदीचे सुधारित दर खालीलप्रमाणे आहेत:

सोने-चांदीचे आजचे ताजे दर (Gold-Silver Rate 26 June 2026)
सोन्याचे भाव (प्रति १० ग्रॅम):
२४ कॅरेट सोने: आज २४ कॅरेट सोन्याचा भाव कालच्या (२५ जून) तुलनेत प्रति १० ग्रॅम ९४० रुपयांनी घसरला आहे. काल याची किंमत १,४१,०७० रुपये होती, ती आज घटून १,४०,१३० रुपयांवर आली आहे.

२२ कॅरेट सोने: २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ८६० रुपयांची घसरण झाली आहे. काल १,२९,२२० रुपयांवर असलेले सोन्याचे भाव आज १,२८,३६० रुपयांवर आले आहेत.

चांदीचे भाव (प्रति किलो):
चांदीच्या किमतीत काल (२५ जून) प्रति किलो तब्बल १०,००० रुपयांची मोठी घसरण झाली होती. त्या तुलनेत आज चांदीच्या भावात प्रति किलो १०० रुपयांची किरकोळ घसरण दिसत आहे. काल चांदीचा दर प्रति किलो २,३५,००० रुपये होता, तो आज २,३४,९०० रुपये प्रति किलो एवढा आहे.

भविष्यात पुन्हा भाव वाढणार का? (UBS चा अंदाज)
जागतिक ब्रोकरेज फर्म UBS (Union Bank of Switzerland) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सोने आणि चांदीच्या किमतीतील ही घसरण तात्पुरती आहे. जानेवारी २०२६ मधील आपल्या सर्वोच्च पातळीवरून सोने आतापर्यंत २८% टक्क्यांनी घसरले आहे.

परंतु, या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ५,५०० डॉलर प्रति औंस पर्यंत झेप घेऊ शकते. म्हणजेच, पुढील सहा महिन्यांत सोन्याचे दर सध्याच्या पातळीवरून तब्बल ३६% टक्क्यांनी वाढू शकतात, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते.

सोने-चांदीच्या दरात घसरण होण्यामागची प्रमुख कारणे:
जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाला असून तो १३ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर (१०१.५०) पोहोचला आहे. यामुळे सोन्यावर दबाव वाढला आहे. किमती घसरण्यामागची ६ प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

अमेरिकन डॉलर मजबूत होणे: डॉलर मजबूत झाल्याने इतर देशांतील चलनधारकांसाठी सोने-चांदी महाग होते, ज्यामुळे जागतिक मागणी घटली.

भूराजकीय तणाव कमी होणे: जागतिक स्तरावरील राजकीय तणाव काहीसा निवळल्याने ‘सेफ हेवन’ (सुरक्षित गुंतवणूक) म्हणून सोन्या-चांदीचे आकर्षण कमी झाले.

गुंतवणूकदारांचे प्रॉफिट बुकिंग: गुंतवणूकदारांनी सोने-चांदीमधील आपला नफा काढून (Profit Booking) तो शेअर बाजार आणि इतर जोखमीच्या मालमत्तांकडे वळवला आहे.

फेडरल रिझर्व्हच्या धोरणांबाबत अनिश्चितता: अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कधी आणि किती कमी करेल, याबाबत बाजारात संभ्रम आहे.

उच्च व्याजदर दीर्घकाळ कायम राहण्याची शक्यता: अमेरिकेत व्याजदर जास्त काळ उच्च पातळीवर राहतील या अपेक्षेमुळे मौल्यवान धातूंवर अधिक दबाव निर्माण झाला.

पर्यायी गुंतवणुकीचे वाढलेले आकर्षण: उच्च व्याजदरामुळे बँका किंवा रोख्यांमधील व्याज देणाऱ्या गुंतवणुकी अधिक आकर्षक ठरत आहेत. त्यामुळे व्याज न देणाऱ्या सोने आणि चांदीसारख्या धातूंकडे गुंतवणूकदारांचा कल कमी होत आहे.

News Title: Gold Silver Rate Today Maharashtra Market Update 26 June 2026

Join WhatsApp Group

Join Now