सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे ताजे दर

On: March 22, 2026 1:17 PM
Today Gold Price
---Advertisement---

Gold Silver Rate Today | गेल्या काही दिवसांपासून उच्चांक गाठणाऱ्या सोने-चांदीच्या दरात आता मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील हालचाली, डॉलरची मजबुती आणि नफावसुलीमुळे दर खाली आले आहेत. 22 मार्च 2026 रोजी सोने-चांदीचे दर घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही एक सुपर्णसंधी आहे.

एमसीएक्स (MCX) वर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे ₹1.44 लाखांपर्यंत खाली आला आहे, तर चांदीचा दर प्रति किलो ₹2.27 लाखांवर घसरला आहे. आयबीजेए (IBJA) च्या आकडेवारीनुसार, आठवड्याच्या सुरुवातीला ₹1,56,436 असलेला सोन्याचा भाव शुक्रवारपर्यंत ₹1, 47,218 वर आला.

चांदीतही मोठी घसरण दिसून आली असून, एका आठवड्यात प्रति किलो ₹16,000 पेक्षा जास्त घट झाली आहे. सध्या चांदीचा दर ₹2,32,364 च्या आसपास पोहोचला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर साधारण ₹1,45,970 ते ₹1,46,000 प्रति 10 ग्रॅम दरम्यान आहे, तर 22 कॅरेट सोनं ₹1,33,800 च्या आसपास आहे. चांदीचा दर महाराष्ट्रात प्रति किलो ₹2.32 लाख ते ₹2.40 लाख दरम्यान नोंदवला जात आहे. शहरानुसार किंचित फरक दिसत असला तरी एकूण कल घसरणीचाच आहे.

तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील तणाव, विशेषतः इस्रायल-इराण संघर्ष, यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. याशिवाय यूएस फेडरल रिझर्व्ह कडून उच्च व्याजदर कायम ठेवण्याचे संकेत मिळाल्याने सोन्यावर दबाव आला आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यापासून काही प्रमाणात माघार घेतली आहे. पुढील आठवड्यात सोन्याला ₹1,35,000 ते ₹1,40,000 दरम्यान आधार मिळू शकतो, तर ₹1,52, 000 ही प्रतिकार पातळी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp Group

Join Now