गुढीपाडव्याआधीच सोन्याला झळाळी, जाणून घ्या 14K पासून ते 24K सोन्याचे लेटेस्ट दर

On: March 28, 2025 9:00 AM
Gold-Silver Rate Today
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दररोज वाढणारे भाव पाहता, खरेदीदारांवर महागाईचा भार जाणवत आहे. चांदीनेही याआधीच जोरदार भरारी घेतल्याने बाजारात खरेदीचा उत्साह जरा कमीच दिसून येत आहे. जाणून घ्या आज 28 मार्च 2025 रोजीचे सोन्या-चांदीचे दर. (Gold-Silver Rate Today )

गुढीपाडव्यापूर्वी सोन्याची दरवाढ

सप्ताहाच्या सुरुवातीला दोन दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवारी सोन्याच्या दरात अनुक्रमे 210 आणि 330 रुपयांची घसरण झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा तेजीची लाट आली असून, बुधवारी 110 रुपयांनी आणि गुरुवारी तब्बल 440 रुपयांनी वाढ नोंदवली गेली. एकूण 550 रुपयांची वाढ झाल्याने आता 22 कॅरेट सोन्याचा दर 82,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोनं 89,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आज सकाळच्या सत्रात जाहीर करण्यात आलेल्या दरांनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,417 रुपये, 23 कॅरेट 88,063 रुपये, तर 22 कॅरेट सोनं 80,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोनं 66,313 रुपयांवर असून, 14 कॅरेटसाठी दर 51,724 रुपये इतका आहे.

चांदीचेही दर पुन्हा वाढले

21 मार्चपासून चांदीच्या दरात 4100 रुपयांची घसरण झाली होती. सोमवार आणि मंगळवारी किंमती स्थिर होत्या. मात्र बुधवारी चांदीने थेट 1000 रुपयांची उसळी घेतली. गुरुवारी किंमतीत स्थिरता पाहायला मिळाली. सध्या गुडरिटर्न्सनुसार एक किलो चांदीचा दर 1,02,000 रुपये आहे.

IBJAच्या ताज्या दरांनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,775 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. दरांमध्ये ही तफावत वायदे बाजारातील करमुक्त व्यवहार आणि सराफा बाजारातील कर आणि शुल्कामुळे निर्माण होते. (Gold-Silver Rate Today )

घरबसल्या जाणून घ्या सोने-चांदीचे दर

ग्राहकांना घरबसल्या मोबाईलवरूनही सर्व कॅरेटचे दर जाणून घेता येतात. त्यासाठी इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दररोज सोमवार ते शुक्रवार दर जाहीर करते. शनिवार, रविवार आणि केंद्र सरकारच्या सुट्यांमध्ये दर जाहीर होत नाहीत. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे दर मिळवू शकतात. स्थानिक कर आणि शुल्क यांमुळे दरात शहरनिहाय फरक आढळू शकतो.

Title : Gold-Silver Rate Today 28 March 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now