Gold-Silver Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सततची वाढ पाहिल्यानंतर अखेर आठवड्याच्या शेवटी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज 22 मार्च 2025 रोजी या दोन्ही मौल्यवान धातूंनी किंमतीत घट नोंदवत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. जाणून घ्या आजचे ताजे दर
सोने 440 रुपयांनी स्वस्त
गेल्या चार दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दराला शुक्रवारी ब्रेक लागला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने थेट 440 रुपयांनी माघार घेतली. सोमवारपासून गुरुवारपर्यंत सोन्याने उच्चांकी झेप घेतली. मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 440 रुपयांनी वाढ, तर गुरुवारी 220 रुपयांची वाढ झाली होती.
आता गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा दर 82,850 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 24 कॅरेट सोन्याचा दर 90,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
आयबीजेए (IBJA) च्या आकडेवारीनुसार:
24 कॅरेट – ₹88,169
23 कॅरेट – ₹87,816
22 कॅरेट – ₹80,763
18 कॅरेट – ₹66,127
14 कॅरेट – ₹51,579 प्रति 10 ग्रॅम
चांदी 2100 रुपयांनी घसरली
सोनेप्रमाणेच चांदीनेही गेल्या चार दिवसांत दरवाढ अनुभवली होती. मात्र शुक्रवारी चांदीच्या किमतीत थेट 2100 रुपयांची घट झाली. आज सकाळच्या सत्रात देखील घसरणीचे संकेत मिळत आहेत.
सोमवारी – ₹100 घसरण
मंगळवारी – ₹1100 वाढ
बुधवारी – ₹1000 वाढ
गुरुवारी – ₹100 वाढ
शुक्रवारी – ₹2100 घसरण
आता एक किलो चांदीचा दर ₹1,03,000 इतका आहे (गुडरिटर्न्सनुसार). IBJA नुसार हा दर ₹97,620 प्रति किलो आहे.
घरबसल्या जाणून घ्या किंमती
सोने-चांदीच्या दरांबाबत माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी सरकारने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ताजे दर कळवून घेऊ शकतात.
IBJA कडून दररोज सुट्टीचे दिवस वगळून दर प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये थोडा फरक राहतो. कर आणि शुल्कांमुळे सराफा बाजारात दर अधिक असतात.









