आनंदवार्ता! सोनं झालं स्वस्त, 14K ते 24K सोन्याचे लेटेस्ट दर वाचा एका क्लिकवर

On: March 18, 2025 8:48 AM
Gold Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate Today |  गेल्या काही आठवड्यांपासून झपाट्याने वाढणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींना आता ब्रेक लागला आहे. महागाईच्या झटक्यानंतर आता या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये किंचित घसरण झाली आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, येत्या काही दिवसांत हे दर आणखी खाली येऊ शकतात. (Gold-Silver Rate Today)

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण

गेल्या आठवड्यात सोन्याने 1,300 रुपयांची वाढ नोंदवली होती, मात्र त्यानंतर किंचित घसरण झाली. सोमवारी सोन्याचा दर 110 रुपयांनी खाली आला. सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 82,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 89,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीच्या दरातही घसरण

गेल्या दोन आठवड्यांत चांदीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली होती. चांदी 5,000 रुपयांनी महागली होती, मात्र आता किंचित घसरण झाली आहे. सोमवारी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली असून, सध्या 1 किलो चांदीचा दर 1,02,900 रुपये इतका आहे.

14K ते 24K सोन्याचे ताजे दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या नोंदीनुसार, आजचे ताजे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • 24 कॅरेट सोने:  88,101 प्रति 10 ग्रॅम
  • 23 कॅरेट सोने:  87,748 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट सोने:  80,701 प्रति 10 ग्रॅम
  • 18 कॅरेट सोने:  66,076 प्रति 10 ग्रॅम
  • 14 कॅरेट सोने:  51,539 प्रति 10 ग्रॅम
  • 1 किलो चांदी:  99,767 (Gold-Silver Rate Today)

घरबसल्या जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये स्थानिक कर आणि शुल्क यामुळे किंचित फरक दिसू शकतो. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ग्राहक रोजचे दर जाणून घेऊ शकतात. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सोमवारी ते शुक्रवारी अधिकृत दर जाहीर करते.

Title : Gold-Silver Rate Today 18 March 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now