सोनं पुन्हा 75 हजारांवर, चांदीही सुसाट; आज काय आहेत भाव?

On: September 17, 2024 1:03 PM
Gold-Silver Rate Today 17 September 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदी या दोन्ही धातूने आघाडी घेतली आहे. या सप्टेंबर महिन्यात सोनं सुसाट आहे. चांदीचे दर देखील तेजीत आहेत. आज 17 सप्टेंबररोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील दोन्ही धातूने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे. आतापर्यंत सोन्यात 1,000 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. तर चांदीत या काळात 8,600 रुपयांची वाढ दिसून आली. (Gold-Silver Rate Today)

आजचे सोने-चांदीचे दर काय?

ऐन सणासुदीत बेशकिंमती धातूंच्या किमती वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी देखील कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांहून अधिकने वधारले. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच काल 16 सप्टेंबररोजी त्यात 110 रुपयांची वाढ झाली.तर, आज सकाळच्या सत्रात देखील दरवाढीचे संकेत मिळाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,895 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मागच्या आठवड्यात चांदीमध्ये तब्बल 7 हजारांची दरवाढ नोंदवली गेली. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत 100 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,100 रुपये आहे. (Gold-Silver Rate Today)

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73, 489, 23 कॅरेट 73,195, 22 कॅरेट सोने 67,316 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 55,117 रुपये, 14 कॅरेट सोने 42,991 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today)

घरबसल्या जाणून घ्या भाव-

ग्राहक घरी बसल्या देखील सोने आणि चांदीच्या किंमती जाणून घेऊ शकतात. स्थानिक कर तसेच इतर करांमुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येऊ शकते. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात. मात्र, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार या दिवशी किंमती जाहीर होत नाहीत. (Gold-Silver Rate Today)

News Title : Gold-Silver Rate Today 17 September 2024

महत्वाच्या बातम्या –

‘या’ 5 राशींना अनंत चतुर्दशी पावणार, बाप्पा देणार सुख-समृद्धी!

PM मोदींचा आज वाढदिवस, 600 हून अधिक भेटवस्तूंचा होणार लिलाव

..तर बंद होऊ शकते SSY खाते; सुकन्या समृद्धी योजनेत झाला महत्वाचा बदल

आज अनंत चतुर्दशी, ‘या’ राशींवर राहणार गणपती बाप्पाची कृपा!

ईशा देओलकडून खुलासा म्हणाली, ‘सेक्सबदल मला….’

Join WhatsApp Group

Join Now