Gold-Silver Rate Today | एप्रिल-मे महिन्यात मौल्यवान धातूच्या किंमती वाढतच गेल्या. या दोन महिन्यात विक्रमी दर नोंदवले गेले. सोनं थेट 70 हजारांच्याही पुढे गेल्याचं दिसून आलं. मे महिन्याच्या सुरुवातीला याच्या भावात चढाओढ दिसून आली. तर, या आठवड्याच्या सुरुवातीला मात्र, ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
13 मे रोजी सोन्याची किंमत 100 रुपयांनी कमी झाली. तर 14 मे रोजी सोने 400 रुपयांनी स्वस्त झाले. आज 15 मे रोजी देखील सोन्याने दिलासा दिला. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी सुसाट
या आठवड्याची सुरुवात स्वस्ताईने झाली होती. 13 मे रोजी चांदी 500 रुपयांनी उतरली. तर 14 मे रोजी चांदीने 700 रुपयांची दरवाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,200 रुपये आहे.
चांदीने जराही दिलासा दिला नाही. चांदीचे (Gold-Silver Rate Today) भाव सध्या सुसाट आहेत. गेल्या आठवड्यात चांदीने 4700 रुपयांची भरारी घेतली होती. या आठवड्यात पुन्हा त्यात 700 रुपयांची वाढ नोंदवली गेली.
कॅरेटचा भाव ‘असा’ असेल
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 72,335 रुपये, 23 कॅरेट 72,045 रुपये, 22 कॅरेट सोने 66,259 रुपये झाले. 18 कॅरेट 54,251 रुपये, 14 कॅरेट सोने 42,316 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय (Gold-Silver Rate Today) बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
News Title : Gold-Silver Rate Today 15 May 2024
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! 72 तासांत 8 किलो सोने, 14 कोटी रोकडसह 170 कोटींची मालमत्ता जप्त; कोण आहे मालक
मोदींपेक्षाही कंगना रनौत श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून हैराण व्हाल
पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती किती? आकडेवारी एकूण व्हाल थक्क
राखी सावंतची प्रकृती खालावली; ‘या’ आजाराने त्रस्त
तुम्हीही चहा-कॉफीचे शौकीन आहात, सावधान! शास्त्रज्ञांनी दिला भयंकर इशारा






