सोन्याची पुन्हा मोठी भरारी, जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती!

On: March 11, 2025 10:03 AM
Today Gold Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी चढ-उतार दिसून आली होती. आठवड्याच्या सुरुवातीला सोने 1360 रुपयांनी महागले होते, मात्र त्यानंतर किंमतीत सातत्याने घसरण झाली. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 11 मार्च 2025  रोजी सोन्याने पुन्हा तेजी पकडली आहे, तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. (Gold-Silver Rate Today)

सोन्याच्या दरात वाढ

गेल्या आठवड्यात सोमवारी 760 रुपये, तर मंगळवारी 600  रुपये वाढ झाल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र, 10 मार्च रोजी सोन्याचा दर पुन्हा 110 रुपयांनी वाढला आहे. आज सकाळच्या सत्रात देखील किमतीमध्ये दरवाढ दिसून आली.

  • 22 कॅरेट सोने: 80,065 प्रति 10 ग्रॅम
  • 24 कॅरेट सोने:  87,970 प्रति 10 ग्रॅम

चांदीच्या किंमतीत घसरण

गेल्या आठवड्यात चांदीने 2100 रुपयांची झेप घेतली होती, मात्र आता किंमतीत काहीशी नरमाई दिसत आहे. आजच्या सत्रात चांदीचा दर 100 रुपयांनी कमी होऊन 99,000 प्रति किलो झाला आहे.

विविध कॅरेट सोन्याचे दर 

  • 24 कॅरेट: 85,932 प्रति 10 ग्रॅम
  • 23 कॅरेट: 85,855 प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट:78,714 प्रति 10 ग्रॅम
  • 18 कॅरेट: 64,449 प्रति 10 ग्रॅम
  • 14 कॅरेट: 50,270 प्रति 10 ग्रॅम
  • चांदी (1 किलो):  96,634

घरबसल्या जाणून घ्या सोने-चांदीचे दर

ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे अधिकृत दर जाणून घेऊ शकतात. दररोज शनिवार, रविवार आणि केंद्र सरकारच्या सुट्यांचे दिवस वगळता नवीन किंमती अपडेट केल्या जातात. (Gold-Silver Rate Today)

Title : Gold-Silver Rate Today 11 March 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now