दिवसाची सुरुवात दरवाढीने, सोनं तब्बल 5000 रुपयांनी महागलं; जाणून घ्या आजचे रेट

On: April 11, 2025 8:45 AM
Today Gold Rate
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला असून अवघ्या 33 तासांत 4,900 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार तणाव, मध्यवर्ती बँकांची खरेदी आणि गुंतवणूकदारांच्या सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधामुळे ही मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. (Gold-Silver Rate Today )

MCX वर सोन्याचा उच्चांक 

गुरुवारी देशातील मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोन्याचा भाव 91,850 रुपयांवर पोहोचला. हे दर महावीर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत गाठले गेले. या सत्रात सोन्याने 1,946 रुपयांची झपाट्याने वाढ नोंदवली आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचले. 7 एप्रिलला नोंदवलेल्या 86,928 रुपयांच्या तुलनेत ही किंमत जवळपास 5.5% जास्त आहे.

सोन्याच्या किमतीत या झपाट्याच्या वाढीमागे जागतिक टेरिफ तणाव कारणीभूत ठरत आहे. अमेरिका आणि चीनमधील टेरिफ युद्धामुळे बाजारात अस्थिरता पसरली असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे कल वाढवला आहे. अमेरिकेने इतर देशांवरील टेरिफ तात्पुरते स्थगित केले असले, तरी चीनवरील टेरिफ 125% पर्यंत वाढवली गेली आहे, ज्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर झाला आहे.

डॉलरमध्ये कमजोरी आणि आशियात मागणी वाढ

जगभरातील जिओ-पॉलिटिकल तणाव, विशेषतः अमेरिका-चीन संबंधांमुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी वाढवली आहे. चीनमध्ये तर गोल्ड ETF मध्ये विक्रमी गुंतवणूक झाल्याचा उल्लेख ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालात करण्यात आला आहे. त्याचबरोबर अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळेही सोन्याच्या किमतीला आधार मिळतो आहे.

अमेरिकेत महागाई वाढण्याची भीतीही यामागे एक महत्त्वाचा घटक आहे. मार्च महिन्यात अमेरिकी CPI फेब्रुवारीच्या तुलनेत कमी नोंदवण्यात आला आहे, त्यामुळे व्याजदर कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे डॉलरचे मूल्य घसरले आणि परिणामी सोन्याच्या दरात वाढ झाली. (Gold-Silver Rate Today )

या पार्श्वभूमीवर आशियातील काही देश, विशेषतः इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्येही आर्थिक अस्थिरतेच्या चिंतेने नागरिक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. तज्ञांच्या मते, जर अमेरिका-चीन दरम्यानचा व्यापार तणाव कायम राहिला, तर सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपली धोरणं सावधपणे ठरवावीत, असा सल्ला दिला जात आहे.

 English Title: Gold-Silver Rate Today 11 April 2025 

 

Join WhatsApp Group

Join Now